पोर्टफोलिओमध्ये असलेल्या कंपन्यांच्या भागांमध्ये होणाऱ्या हालचालीवर इक्विटी म्युच्युअल फंडांतून मिळणारे उत्पन्न अवलंबून असते. त्यामुळे या म्युच्युअल फंडांपासून मिळणारे उत्पन्न मोजताना त्याची तुलना हा फंड वापरत असलेल्या बेंचमार्कशी करावी लागते.
उदाहरणार्थ, तुमची गुंतवणूक निफ्टी हा बेंचमार्क असलेल्या म्युच्युअल फंडात होत असेल आणि त्या फंडाने गेल्या वर्षभरात ३० टक्के उत्पन्न दिले असेल, त्याचवेळी निफ्टीने २५ टक्के उत्पन्न दिले असेल तर याचा अर्थ या म्युच्युअल फंडाची कामगिरी बेंचमार्कपेक्षा उत्तम झाली, असा होतो. समजा या म्युच्युअल फंडाने २२ टक्के उत्पन्न दिले तर त्याची कामगिरी बेंचमार्कपेक्षा कमी झाली. अशी तुलना अनेक वेबसाइट्सवर किंवा म्युच्युअल फंडांचे ऑनलाइन वितरण करणाऱ्यांकडून उपलब्ध करून दिली जाते. मात्र गुंतवणूकदारांनी इक्विटी फंडांचे उत्पन्न मोजताना लार्ज कॅपमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची तुलना स्मॉल कॅप फंडाशी किंवा सोने, मुदतठेवी किंवा रिअल इस्टेट अशा अन्य मत्तांशी (अॅसेट्स) करू नये.
एकाच गटातील स्पर्धक फंडाशी तुमच्या फंडाची कशी तुलना करता येईल?
एखाद्या स्पर्धक योजनेपेक्षा आपण रक्कम गुंतवलेली योजना सर्वार्थाने पुढे आहे ना, हे पाहणे गुंतवणूकदाराचे कर्तव्य ठरते. यासाठी एकाच प्रकारच्या (उदा. लार्ज कॅप) फंडांची तुलना केवळ त्याच प्रकारच्या अन्य फंडांशी करणे गरजेचे आहे. प्रत्येक गटातील फंडाच्या वाटचालीला कारणीभूत ठरणारे घटक वेगवेगळे असतात आणि प्रत्येक सेट , मार्केट सायकलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाटचाल करत असतो. चांगला फंड असेल तर त्याने बेंचमार्कपेक्षा अधिक चांगली वाटचाल त्याच्या गटात करणे अपेक्षित असते. समजा एखाद्या फंड गटात १५ फंड आहेत आणि तुमचा फंड तळातील तीन फंडांमध्ये आहे तर
या फंडाने गटाची सरासरी पातळी ओलांडली नाही तर तो फंड सोडून अन्य फंडांकडे गुंतवणूक वळवणे श्रेयस्कर ठरते . पण त्यामागची करणेही पाहूनच असा निर्णय घ्यावा !!