अनेक व्यावसायिक संस्था किंवा व्यक्ति आपले व्यावसायिक व्यवहार बँकेच्या करंट अकाउंट अथवा बचत खात्यामार्फत करतात. करंट अकाउंटवर जी रक्कम असेल तिला काहीही व्याजप्राप्ती होत नाही. तसेच बचत खात्यावरील रकमेवर मिळणारे ३ % ते ४ % व्याज हे चाक्रवाढीच्या स्वरूपात नसते. बँकेच्या खात्यात बिनव्याजी असलेली रक्कम किंवा काही दिवासांसाठी न लागणारी रक्कम आपण म्युचुअल फंडाच्या “फ्लोटिंग रेट फंड” किंवा कॅश मॅनेजर किंवा जीसेक फंड किंवा ट्रेझरी adavntage फंड यामधे कमीत कमी दोन दिवसांसाच्या कालावाधीसाठीसुध्दा ठेऊ शकतो व त्यावर सामान्यपणे ६% ते ८% व्याजही मिळवू शकतो. हे व्याज चक्रवाढ गतीचे (CAGR) असते.

साधारणतः सर्व बँका शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी बंद असतात त्यामुळे सुट्ट्या पाहूनच आपल्या व्यवहारांची रचना करावी लागते. शिवाय जर पुढील काही दिवसांसाठी आपल्याला पैसे लागणार नसतील तर आपण ह्या स्किमचा फायदा घेऊ शकतो.

उदाहरणार्थ : एखाद्या व्यावसायिकाच्या करंट अकाउंटमधे रु. २० लाख रक्कम ही विनाव्याज व नजीकच्या काळात न लागणारी आहे. समजा हे सर्व पैसे फक्त शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवसांसाठी Floating Rate Fund या फंडात ट्रान्सफर केले व पुनः सोमवार, मंगळवारी लागतील हे गृहीत धरून बँक अकाऊंटमधे आणले तर वर्षभरातील सर्व सुट्ट्यांचे ८५ दिवस गृहीत धरता त्या व्यावसायिकाला कमीत कमी रु. ३५००० व्याजरूपी मिळू शकतात. ज्या रकमेला काहीही व्याज मिळणार नव्हते त्या रकमेवर रु. ३५,००० पर्यंत वर्षाकाठी व्याजाची रक्कम मिळाल्यास हा निश्चितच फायद्याचा विषय होऊ शकतो. तसेच सर्वात महत्वाची बाब म्हणजे या स्वरूपाच्या म्युच्युअल फण्डमधील गुंतवणूक ही धोकादायक नाही. सर्व म्युच्युअल फंड कंपन्या ह्या  अशा स्वरूपाच्या निधी स्वीकारत असतात.

पॅन कार्ड व आधार कार्ड असलेला कोणताही मनुष्य रु. ५०० च्या पटीत कितीही रक्कम या फंडामधे गुंतवू शकतात.

सदरील विषयाच्या अधिक माहितीसाठी किंवा आपले पैसे F R F मध्ये गुंतवण्यासाठी कार्यालयाशी संपर्क करा.