शेअरखान तर्फे इन्स्टा एमएफ हा म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याची काही वैशिष्ट्ये पहा !!

म्युच्युअल फंड वितरण हा असा व्यवहार आहे की ज्यामध्ये गुंतवणूकदाराला पर्याय उपलब्ध असतात. एखाद्या फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या फंडाच्या कामगिरीची तुलना होणे अनिवार्य असते. तरुण पिढी technosavy असल्याने हे सर्व यावर  उपलब्ध आहे .

 

या सुविधेची वैशिष्टय़े नेमकी काय आहेत?

या सुविधेकरिता वापरकर्त्यांने ‘केवायसी’ची पूर्तता करणे आवश्यक आहे. ‘केवायसी’ असलेला गुंतवणूकदार आमच्या मंचावर जाऊन  त्याच्या वैयक्तिक तपशिलाच्या आधारे लगेचच आपली गुंतवणूक सुरू करू शकतो.

या सुविधेसाठी डीमॅट खाते असणे आवश्यक नाही. डीमॅट नसलेल्या गुंतवणूकदारांनाही  उपलब्ध असणारा हा मंच आहे. हल्लीची पिढी सर्वच बाबतीत तत्रज्ञानावर अवलंबून असल्याने म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठीसुद्धा तंत्रज्ञानाचा वापर होणे अनिवार्य होते. आम्ही नव्या पिढीला गुंतवणुकीसाठी तंत्रज्ञानस्नेही मंच याद्वारे उपलब्ध करून दिला. म्युच्युअल फंड खरेदी हल्ली अगदी सिनेमाकरिता तिकीट खरेदी करणे इतपत सहज झाली आहे. नियो आणि रोबो अ‍ॅडव्हायझर हे गुंतवणुकीतील अद्यवत पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूकविषयक वैयक्तिक सल्लामसलतीसाठी मानवी सल्लागारावर अवलंबून राहावे लागणार आही.

आमच्या या मंचावर ‘फंड्स वुई लाईक’ असा एक पर्याय आहे यावर ‘क्लिक’ केल्यावर आमच्या शिफारसप्राप्त फंडांची यादी गुंतवणूकदाराला उपलब्ध होत असते. सध्या ५५ फंडांचा एकगठ्ठा पर्याय वापरकर्त्यांला दिसणार असून या फंडातून त्याने त्याच्या गरजेची पूर्ती करणाऱ्या फंडांची खरेदी करावी, अशी अपेक्षा आहे.

असे मत शेअरखान चे स्टीफन ग्रोनिंग यांनी नोंदविले आहे

 

 

 

अभिप्राय द्या!