माझ्यकडे एक गुंतवणूकदार अत्यंत कमी रक्कम dividend pay out हवा हे सांगून आपली गुंतवणूक करून गेला ! पण अत्यंत कमी लाभांश स्वीकारून ह्या माणसाला काय फायदा ? ह्याचा मी विचार करून हा पर्याय कोणी घ्यावा हे लिहिण्याचे ठरविले !!

लाभांश करपात्र असतात का?

गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअ फंडांकडून मिळणारा लाभांश करमुक्त असतो. मात्र डेट फंडाच्या बाबतीत फंडांला उपकर आणि अधिभार मिळून २८.८४ टक्के लाभांश वितरण कर भरावा लागतो. इक्विटी म्युच्युअल फडासाठी मात्र लाभांश वितरण कर नसतो.

लाभांश पर्याय कुणी घ्यावा?

केलेल्या गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळावे अशी इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांनी लाभांश पर्याय निवडावा, असा सल्ला वित्त नियोजक देतात. इक्विटी फंडातून एसआयपीच्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती तयार करण्याचा उद्देश असेल तर अशा गुंतवणूकदारांनी वृद्धी पर्याय निवडावा. याचे कारण, लाभांश दिला जातो तेव्हा चक्रवाढीचा लाभ गुंतवणुकीला मिळत नाही. उच्च करमर्यादेत असणाऱ्या व तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी रक्कम गुंतवणाऱ्यांनी लिक्विड किंवा अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडासाठी दैनंदिन लाभांशाचा पर्याय निवडावा. या उच्च करमर्यादेत येणाऱ्या गुंतवणूकदारांना ३०.९ टक्के कर भरावा लागतो, तर त्या तुलनेत लाभांश वितरण कर २८.८४ टक्के असतो.

अभिप्राय द्या!