लिक्विड फंड आधुनिक  बचत खाते

लिक्विड फंडातील खाते हे म्युच्युअल फंडाचे बचत खातेच आहे . आपल्याकडील अतिरिक्त रक्कम नेहमीच लिक्विड फंडात गुंतवायला हवी. चांगल्या सवयी अंगी बाळगायच्या तर आपल्या सवयीत बदल करायला हवेत. जास्तीचे पैसे आपल्याला बँकेत ठेवण्याची सवय असते हेच पैसे लिक्विड फंडात ठेवले तर बचत खात्यापेक्षा अधिक नफा होऊ शकतो. लिक्विड फंड आपली गुंतवणूक ही अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये (सीडी सीपी), थोडी रक्कम ही अल्प मुदतीच्या सरकारी कर्जरोख्यात (टी बिल्स) केली जाते. या योजनेत मुद्दल कमी होण्याची शक्यता कमीच असते. लिक्विड फंडात अगदी आपल्याकडील दोन-तीन दिवस ते सहा महिने कालावधीसाठी उपलब्ध असलेली रक्कम गुंतविणे योग्य असते. ज्या ज्यावेळी मोठी रक्कम बचत खात्यात शिल्लक असेल त्या त्या वेळी या लिक्विड फंडात गुंतवणूक करून जास्त उत्पन्न मिळविण्याची संधी साधायला हवी.

प्रत्येक म्युच्युअल फंडांचा लिक्विड फंड असतो. या गुंतवणुकीतून वार्षिक सरासरी ६.५० टक्के परतावा मिळतो. (रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘रेपो रेट’ इतका!). बँकेतील बचत खात्यात मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त उत्पन्न यातून मिळते – मात्र हे उत्पन्न किती मिळेल याची गुंतवणूक करताना कोणतीही खात्री दिली जात नाही. कारण गुंतवणूक केलेल्या रोख्यांवरचा परतावा कायम कमी-अधिक होत असतो.

अभिप्राय द्या!