गुंतवणूकदारांनी अखंड सावध राहणे गरजेचे आहे. याचे कारण स्थूल परिस्थितीत बदल होऊन बाजारात करेक्शन येऊ शकते. बाजाराची सध्याची वाटचाल ही भांडवल पर्याप्तेवर अवलंबून राहते. यावेळीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. एसआयपीद्वारे दरमहिना सुमारे सहा हजार कोटी रुपये भांडवल बाजारात येत आहेत. यामध्ये देशी गुंतवणूकदारांचा सहभाग म्युच्युअल फंडांमध्ये वाढतो आहे. बाजाराच्या वाटचालीला परदेशी भांडवलाचाही हातभार मिळत आहे. बाजार असाच वर जात राहिला तर, येत्या तीन ते चार वर्षांत सेन्सेक्स ५० हजार ही पातळीही गाठू शकेल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

व्यवहार सावधपणे करा

बाजाराचे चित्र अत्यंत अनुकूल दिसत असले तरी गुंतवणूकदाराने अखंड सावध राहणेच योग्य आहे. ही सावधानता कशा प्रकारची घ्यायची? सर्वप्रथम, बाजार सातत्याने वर जात असल्याुमळे आता बाजारातून बाहेर पडण्याचा विचार करू नये. त्याऐवजी बाजारात गुंतवणूक सुरूच ठेवावी आणि कमीतकमी जोखीम घेता यावी यासाठी उपाययोजना करावी. जोखीम व्यवस्थापन हे सध्याच्या काळात खूप कठीण जाणार आहे. यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे कंपन्यांचे भाग खरेदी करताना ते दीर्घ काळासाठी करावेत. त्याचवेळी असे भाग खरेदी करताना निफ्टीसारख्या विस्तारित निर्देशांकाचे अनुसरण करावे.

आपल्या भांडवली गुंतवणुकीची पुनर्रचना करणे हा दुसरा उपाय आहे. कोणत्याही अन्य मत्तागटापेक्षा इक्विटीने चांगले उत्पन्न सध्या दिले आहे. त्यामुळे साहजकिच तुमच्या पोर्टफोलिओत इक्विटीला झुकते माप दिले गेले आहे. हे प्रमाणा पुन्हा पूर्ववत करणे आता गरजेचे आहे. हे कसे करता येईल? असे करताना गुंतवणूकदाराने स्वतःच्या गुंतवणुकीचा विचार करूनच निर्णय घ्यावा. मत्ता पुनर्रचना करताना संबंधित गुंतवणूकदाराकडे खर्चण्यायोग्य पैसा असेल तर त्याने डेटसारख्या मतातगटात गुंतवणूक करावी. असे शक्य नसेल तर मग इक्विटीतील पैसा डेटकडे फिरवावा.

अभिप्राय द्या!