शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत झालेल्या तुफानामुळे गुंतवणूकदारांनी धसका घेतला असला तरी तज्ज्ञांच्यामते शेअर खरेदीसाठी ही चांगली वेळ आहे. अनेक चांगले चांगले शेअर  स्वस्तात उपलब्ध आहेत आणि आत्ताच खरेदी केले तर काही शेअर तर 62 टक्क्यांपर्यंत फायदा देऊ शकतात. विशेष म्हणजे असे काही शेअर्स आहेत ज्यांची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी म्हणजे 200 रुपयांपेक्षा कमी आहे. जवळपास 13 महिने तेजीत असलेल्या शेअर बाजाराला लागलेला लगाम स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी पथ्यावर पडणारी गोष्ट असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. फायनान्शियल एक्सप्रेसने गुंतवणूक तज्ज्ञांच्या दाखल्याने असे काही स्टॉक्स सुचवले आहेत जे 200 रुपयांपेक्षा कमी किमतीला उपलब्ध आहेत आणि तुम्हाला कमी कालावधीत देऊ शकतात भरपूर परतावा…

जैन इरिगेशन

गेल्या एका वर्षात जैन इरिगेशननं 18 टक्क्यांचा परतावा दिला आहे. एचडीएफसी सेक्युरिटीज या रीसर्च व ब्रोकरेज फर्मनं हा शेअर 187 रुपयांपर्यंत म्हणजे तब्बल 62 टक्के वाढ इतकी झेप घेऊ शकतो.

एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज

एल अँड टी फायनान्स होल्डिंग्जच्या शेअरचा बाव गेल्या एका वर्षामध्ये 50 टक्क्याने वधारला आहे. हा शेअर सध्याच्या बाजारभावापेक्षा आणखी 33 टक्क्यांनी वधारेल असा अंदाज अॅक्सिस सेक्युरिटीज वर्तवला आहे.

इक्विटास होल्डिंग्ज

गेल्या 12 महिन्यांमध्ये इक्विटास होल्डिंग्जचा भाव 24 टक्क्यांनी पडला आहे. अॅक्सिस सेक्युरिटीज या रीसर्च व ब्रोकरेज कंपनीने मात्र आता हा शेअर सध्याच्या पातळीवरून 32 टक्क्यांनी वधारून 185 रुपयांपर्यंत मजल मारेल असा अंदाज वर्तवला आहे.

गेल्या एका वर्षामध्ये टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशनचा शेअर तब्बल 150 टक्क्यांनी वधारला आहे. हा शेअर 227 रुपयांची पातळी गाठू शकतो असा अंदाज एचडीएफसी सेक्युरिटीजने वर्तवला आहे. ही वाढ सध्याचा बाजारभाव लक्षात घेता तब्बल 46 टक्क्यांची आहे.

अभिप्राय द्या!