लहान गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीपीएफमधील गुंतवणूक आपत्कालीन स्थितीत मुदतपूर्ती होण्यापूर्वीच काढू देण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजेच पीपीएफमध्ये खाते उघडल्यापासून पाच वर्षांच्या आत आता पीपीएफमधील रक्कम काढण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तो म्हणजे अल्पबचत योजनांचे खाते आता सज्ञान नसलेल्या मुलांच्या नावे उघडण्यासही अनुमती मिळण्याची शक्यता आहे. यासाठी वित्त विधेयक,2018 मध्ये सुयोग्य बदल केले जाणार आहेत. पीपीएफ कायदा आणि बचत प्रमाणपत्र कायदा रद्द केला जाण्याची शक्यता असून तीन ऐवजी आता एकच कायदा आणला जाणार आहे. शिवाय सरकारकडे आता अल्प बचत योजनांचा ‘लॉक इन पीरियड’ बदलण्याचा अधिकार दिला जाणार आहे.

अभिप्राय द्या!