ग्रोथ फंड हे ग्रोथ स्टॉक्स खरेदी करतात. या फंडाच्या पोर्टपोलिओमध्ये समाविष्ट कंपन्या शेअर बाजारातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत वेगाने वृद्धी दाखवतात. अर्थव्यवस्था तिच्या बिझनेस सायकलच्या मध्यात किंवा अंतिम टप्प्यात असते तेव्हा हे स्टॉक्स चांगली कामगिरी करतात. ग्रोथ स्टॉक्स सामान्यतः कमी लाभांश देतात, तसेच प्राइस-टू-अर्निंग्ज, मार्केट कॅपिटलायझेशन-टू-सेल्स व प्राइस-टूबुक व्हॅल्यू या गुणोत्तरांपेक्षा या स्टॉक्सचे मूल्य अधिक असते. ग्रोथ फंड लार्ज कॅप व मिड कॅप स्टॉक्स खरेदी करू शकतात.
ज्या कंपन्यांच्या समभागांची किंमत कमी ठरवलेली असते, परंतु त्या कंपन्यांना चांगले भवितव्य असते, अशा कंपन्यांमध्ये व्हॅल्यू फंड गुंतवणूक करतात. या कंपन्यांच्या समभागांची किंमत सतत कमी राहणार नसते. त्यामुळे या समभागांची किंमत वधारण्यापूर्वी हे फंड त्यांत मोठी गुंतवणूक करतात. व्हॅल्यू फंडांचा उद्देश ग्रोथ हा नसून गुंतवणुकीची सुरक्षितता हा असतो. त्यामुळे भावी काळात चांगला लाभांश देऊ शकणाऱ्या व भांडवलवृद्धी करण्याची क्षमता असणाऱ्या कंपन्यांमध्ये व्हॅल्यू फंड गुंतवणूक करतात.
ग्रोथ स्टॉक हा व्हॅल्यू स्टॉकमध्ये परिवर्तित करता येतो का?
ग्रोथ व व्हॅल्यू गुंतवणुका या स्थिर नसतात. व्हॅल्यू स्टॉकमधील किंमत वाढली तर मग तो व्हॅल्यू स्टॉक उरत नाही. त्याचप्रमाणे ग्रोथ स्टॉकने वृद्धी दाखवणे बंद केले, त्याचे बाजारमूल्य सातत्याने घसरू लागले तर तो ग्रोथ स्टॉक रहात नाही. तरीही म्युच्युअल फंड त्यांच्या ग्रोथ व व्हॅल्यू धोरमांशी प्रामाणिक राहतात.