महिन्याच्या पहिल्या तारखेला १० हजार रुपयांची एसआयपी तुम्ही केली आहे. या तारखेला एसआयपी कापली जात असलेल्या तुमच्या बँक खात्यात पुरेसी रक्कम नसल्यास काय होईल?

तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसेल तर एसआयपीसाठी बँकेला म्युच्युअल फंडाकडून करण्यात आलेली विनंती बँकेकडून नाकारली जाईल आणि त्या महिन्यातील तुमची एसआयपी पूर्ण होणार नाही. एसआयपी रद्द झाली किंवा पैसे भरले गेले नाहीत म्हणून संबंधित फंड हाउसकडून कोणताही दंड आकारला जात नाही. मात्र, तुमच्या बँकेकडून ईसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम) चुकल्याबद्दल तुम्हाला दंड आकारला जाईल. हा दंड प्रत्येक बँकेनुसार बदलता असतो. तुमची एसआयपी सुरूच राहील आणि पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा बँकेकडे म्युच्युअल फंडाकडून विनंती केली जाईल. एकामागून एक असा तीन एसआयपी चुकल्यासच फंडाकडून बँकेला एसआयपीसाठी विनंती करणे बंद होईल आणि त्यानंतर तुमची एसआयपी बंद होईल.

 एसआयपी बंद झाल्यास माझ्या पैशांचे काय होईल?

एसआयपीच्या माध्यमातून गोला केली गेलेली रक्कम त्या म्युच्युअल फंडात पडून राहिल. समजा, तुम्ही दोन हजार रुपये महिना अशी एसआयपी काढली आहे, १५ हप्ते नियमित भरले आहेत आणि त्यानंतर एसआयपी खंडित झाली आहे. अशा स्थितीत तुमची ३० हजार रुपये जमा गुंतवणूक म्युच्युअल फंड गुंतलेलीच राहील आणि तुम्ही ही रक्कम काढेपर्यंत त्या योजनेचे सर्व लाभ या ३० हजारांवरही मिळत राहतील.

एसआयपी बंदी केल्यास संबंधित म्युच्युअल फंडाकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही. फंडाच्या एग्झिट लोड नियम पाहून तुम्ही हे पैसे काढूनही घेऊ शकता.

अभिप्राय द्या!