सध्याच्या काळात आपल्या मुलांचे शिक्षणरुपी भविष्य पूर्ण करण्यासाठी आपण अपेक्षा करतो त्यपेक्षाही कितीतरी जास्त पैसा लागू शकतो. K. G. तील प्रवेशापासून ते अभियांत्रिकी वा वैद्यकीय शिक्षणासाठीच्या खर्चात सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी आपण बाळाचे भवितव्य उज्वल होण्यासाठी “UTI- Children’s Carrier Plan” या योजनेद्वारे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.
- ही योजना १९७३ पासून सुरु करण्यात आली असून अत्यंत चांगला परतावा आतापर्यंत या योजनेतून अनेकांनी घेतला आहे.
- ही एक म्युच्युअल फंडावर आधारित योजना आहे. म्युच्युअल फंड मॅनेजर हे पैसे ६०% डेट फंड व ४०% इक्विटी फंडात गुंतवितो.
- यामधे दरमहा रु. १००० गुंतविल्यास त्याचे बाल सज्ञान होईपर्यंत (वय वर्ष १८ पर्यंत) साधारणपणे ११% ते १२ % चक्रवाढ व्याजाने वृध्दी होऊन गुंतविलेल्या रकमेचे साधारणपणे रु. ६ ते रु. ७ लाख मिळू शकतात.
- हे पैसे मुलाच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आपण १८ वर्षानंतर केव्हाही काढू शकतो किंवा त्याची शिष्यवृत्ती सुध्दा घेऊ शकतो.
- यामधे जेवढी जास्त गुंतवणूक केली जाईल तेवढे चांगले असते तसेच एकरकमी गुंतवणूक करता येते.
- यामधे गुंतवलेले पैसे बाळ सज्ञान झाल्यावर उच्च शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी वापरता येतात.