काही वर्षांपूर्वी जेव्हा वार्षिक दरडोई उत्पन्न हजार डॉलरच्या आसपास होते, तेव्हा भारतात ‘रोटी- कपडा-मकान’ या गोष्टींना प्राधान्य होते. आज भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न १,८०० डॉलरवर पोहचले असल्याने प्राथमिक गरजा भागविल्यानंतर, मोबाईल, टीव्ही आणि वॉशिंग मशीनची खरेदी होताना दिसत आहे. हाच कल थोडय़ा फार बदलाने पुढील वीस पंचवीस वर्षे टिकून राहिलेला दिसेल.

कॅनरा रोबेको ‘फोर्स’ फंड हा मल्टी सेक्टर फंड आहे. हा फंड फायनान्शियल अपॉर्च्युनिटीज, रिटेल कंझम्पशन आणि एन्टरटेन्मेंट या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणारा फंड असून या उद्योग क्षेत्रांच्या आद्याक्षरांपासून ‘फोर्स’ हा शब्द तयार झाला आहे. हा मल्टी सेक्टर प्रकारचा फंड असल्याने गुंतवणुकीसाठी क्रम ठरलेला आहे. ही गुंतवणूक खाजगी बँका, ग्राहकाभिमुख टिकाऊ वस्तू, गैर बँकिंग वित्तीय कंपन्या, माध्यमे आणि मनोरंजन, वैयक्तिक वापराच्या वस्तू अशा क्रमाने ठरविली गेली आहे.

वाढत्या उपोभोग्य उत्पन्नामुळे उद्याची खरेदी कर्ज काढून पण आजच करण्याकडे नवीन पिढीची मानसिकता आहे. एकंदर कल उपभोगाला अग्रक्रम देणारा आहे.

कॅनरा रोबेको फोर्स फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, झी एन्टरटेनमेंट, एचडीएफसी, कोटक महिंद्र बँक, इंडसिंध बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फिनसव्‍‌र्ह, आयटीसी, ज्युबिलिएंट फूडवर्क्‍स, ब्रिटानिया, सन टीव्ही या समभागांचा समावेश पहिल्या दहा क्रमांकात आहे.  सध्याच्या पीएनबी घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर फंडाच्या गुंतवणुकीत एकाही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला निधी व्यवस्थापकांनी स्थान दिलेले नाही ही नक्कीच दखल घेण्यायोग्य गोष्ट आहे.

त्यामुळे या फंडामध्ये SIP किंवा एक रक्कमी गुंतवणूक करावी अस सल्ला आहे !!

अभिप्राय द्या!