पायाभूत सुविधांसाठी मागील अर्थसंकल्पातील तरतुदींपेक्षा २१ टक्के अधिक तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. या वर्षी ५.९७ लाख कोटींची तरतूद पायाभूत विकासासाठी केली असून या व्यतिरिक्त १.४६ लाख कोटींची तरतूद रेल्वे स्टेशन विकास आणि रेल्वेविषयक पायाभूत सुविधा विकासासाठी तरतूद केली आहे. मागील वर्षीपेक्षा १२० टक्के अधिक म्हणजे ६४ हजार कोटींची तरतूद परवडणाऱ्या घरांच्या विकासासाठी केलेली आहे. सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत ९९ शहरांचा समावेश करून सौर ऊर्जा, इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्टसाठी २ लाख कोटींची तरतूद केली आहे. नमामि गंगे प्रकल्पांतर्गत १८७ प्रकल्पांसाठी १६,७१३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘उडान’ योजनेअंतर्गत नवीन ५६ शहरे हवाई मार्गाने जोडली जाणार आहेत.

जानेवारी-डिसेंबर २०१७ या कालावधीत इन्फ्रास्ट्रक्चर फंडाचा सरासरी परतावा ३८ टक्के होता. या वर्षी इन्फ्रास्ट्रक्चर फंड मागील वर्षांप्रमाणे गगनाला भिडणारा परतावा देणार नाहीत तरीसुद्धा माफक परंतु डायव्हर्सिफाईड फंडापेक्षा अधिक परताव्याच्या अपेक्षेने या फंडांत गुंतवणुकीचा विचार करावयास हरकत नाही. एल अ‍ॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर फंडाच्या गुंतवणुकीत ३१ डिसेंबर २०१७ रोजी एकूण ६१.२ टक्के गुंतवणूक ही इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील समभागांत होती. या फंडाला रिलायन्स डायव्हार्सिफाईड पॉवर सेक्टर फंड, आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंड, सुंदरम इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅडव्हान्टेज हे पर्यायी फंड आहेत.

पण या सर्व फंडामध्ये L&T infastructure हा फंड उजवा आहे त्यामध्ये SIPकरणे सोयीचे आहे हे निश्चित !!

अभिप्राय द्या!