आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात म्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणुकीवर मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर १० टक्के कर आकारणी प्रस्तावित केलेली आहे. समभागसंलग्न म्युच्युअल फंडांसा लाभांश वितरण करही प्रस्तावित आहे. हा बदल अर्थसंकल्पाच्या मंजुरीच्या आधीन असून अर्थ विधेयकाचे संसदेतील मंजुरीनंतर कायद्यात रुपांतर झाल्यावर त्यांची अंमलबजावणी होईल. म्युच्युअल फंडांच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर आकारणीबाबत सध्या असलेली संदिग्धता दूर झाल्यावर पुन्हा या विषयावर वाचकांशी संवाद साधता येईल. भांडवली नफ्यावर कर लागू झाला तरी ‘ईएलएसएस’ करबचतीसाठी सर्वोत्तम पर्याय निश्चितच.
ईएलएसएस ही नावाप्रमाणे भांडवली बाजाराशी निगडित म्युच्युअल फंड योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीतून आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर वजावटीचा लाभ मिळविला जाऊ शकतो. ईएलएसएस फंडातून समभागांमध्ये अधिक प्रमाणात गुंतवणूक केली जात असल्यामुळे ती इतर सर्व करबचत करणाऱ्या पर्यायांपेक्षा वेगळी आणि कर बचतीव्यतिरिक्त संपत्ती निर्मितीची क्षमता देखील अधिक असते.
ईएलएसएस योजनांमधील गुंतवणूक युनिटसच्या वाटपाच्या तारखेपासून तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीच्या आधीन असते. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी गुंतवणूकदारांना त्यांच्या कर सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा. हि विनंती .
नवीन tax प्रणाली लागू होताना वृत्तपत्रातून येणाऱ्या वृत्तांमुळे संभ्रम दिसून आल्याने ही माहिती प्रसिद्ध केली आहे !!