भारतात अजूनही स्त्रीभ्रूणहत्या होते. मुलगी जन्मली की एक, दोन दिवसात अर्भकाची हत्या करण्याचे प्रकार होतात. मग अशा घटना थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२- जानेवारी- २०१५ रोजी “सुकन्या समृध्दी योजना” ही योजना सुरु केली आहे.

या अंतर्गत मुलीच्या पालकांनी मुलीच्या वयाच्या दहा वर्षापूर्वी कमीत कमी रु. १००० deposit ठेवून पोस्ट ऑफिस किंवा बॅंकेत असे खाते उघडावे. समजा पाच वर्ष वयाच्या मुलीच्या नावाने दरमहा रु. १००० ठेव जमा केली तर दरवर्षी रु. १२००० प्रमाणे १४ वर्षात रु. १,६०,००० होतील यावर व्याजासह रु. ६,३१,००० मिळू शकतात. यावर ९% पेक्षा जास्त व्याजदर आहे. याचे व्याज करमुक्त आहे.

मुलीच्या लग्नापर्यंत किंवा वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत हे खाते सुरु राहते. यातील ५०% रक्कम मुलीच्या उच्च शिक्षणासाठी काढता येते (वय १८ नंतर). यासाठी खालील दाखले लागतात :

  • मुलीचा जन्म दाखला
  • रहिवासी पुरावा
  • खाते उघडणाऱ्याचे PAN किंवा Adhaar कार्ड आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफीसला किंवा www.indiapost.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या!