सध्या म्युच्युअल मधील गुंतवणुकीचे प्रमाण बरेच वाढले आहे. विशेषतः नोव्हेंबर नंतर हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसले. अश्‍या प्रकारच्या गुंतवणुकीबाबत आता वेगवेगळ्या टी. व्ही. चॅनेलवरून, वर्तमानपत्रातून आणि आणखी वेगवेगळ्या माध्यमातून या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करत असतात. मी सुद्धा या क्षेत्रात गेली ते वर्षे गुंतवणूक सल्लागार म्हणून कार्यरत आहे. या क्षेत्रात मी प्रथम गुंतवणूकदार असल्यामुळे माझा या प्रकारच्या गुंतवणुकीवर खूप विश्वास आहे. म्हणजे जर आपण मुत्यूअल फंड मधील गुंतवणूक मोठ्या कालावधीकरिता सातत्याने केली तर यातून महागाई दराला मात करून परतावा मिळण्याची शक्‍यता मोठी आहे. एक सल्लागार म्हणून काम करताना बऱ्याच गुंतवणूकदारांशी संवाद होतो आणि या संवादनातून असे लक्षात आले की बॅंकेतील कमी होणाऱ्या व्याज दरांमुळे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास तयार तर आहेत पण काही मूलभूत माहितीचा अभाव जाणवतो. गुंतवणूकदारांनी जर योग्य ती माहिती घेऊन गुंतवणूक केली तर अश्‍या प्रकारच्या गुंतवणुकीतून नुकसान सोसून बाहेर पडण्याची वेळ गुंतवणूकदारांवर येणार नाही. आता आपण ही माहिती प्रश्नोत्तराच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करू या.

गुंतवणूकदार – मला एस. आय. पी. करायची आहे. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक नाही करायची.
एस.आय. पी. हि म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. तुम्ही मुत्यूअल फंड मध्ये दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता. एस.आय. पी. म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. या प्रकारात दर महिन्याला थोडी थोडी रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवत जातो. आणि दुसरा प्रकार म्हणजे एकरकमी गुंतवणूक. म्हणजे या प्रकारात दर महिन्यात गुंतवणूक न करिता एकदाच गुंतवणूक करणे. एस. आय. पी. करण्याकरीता मार्केट ची दिशा बघण्याची गरज नाही. कारण हि गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी करावी. म्युच्युअल फंड मधील एस. आय. पी. आपण आपल्या रिटायरमेंट प्लॅन ला संलग्न करू शकतो. एकरकमी गुंतवणूक करताना मात्र मार्केटच्या दिशेचा अभ्यास असणे आवश्‍यक आहे. अन्यथा हि गुंतवणूक जोखमीची ठरू शकते.

गुंतवणूकदार – मला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यावर किती व्याज मिळेल?
परतावा आणि व्याज यात खूप फरक आहे. परतावा हा अनिश्‍चित असतो पण अमर्यादित ठरू शकतो. व्याज हे निश्‍चित असते पण त्याची एक मर्यादा ठरलेली असते. जे म्युच्युअल फंड शेअर्स मध्ये पैसे गुंतवतात तेथे कधीही व्याज मिळत नाही. तेथे परतावा मिळतो. व्याज मिळणारे म्युच्युअल फंड वेगळे असतात. त्यांना डेट फंड असे संबोधिले जाते.

गुंतवणूकदार – मी म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक कधीही काढू शकतो का?
होय. तुम्ही म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक केव्हाही काढू शकता. पण जे फंड लॉक इन पिरिअड मध्ये असतात ते आपण लॉक इन पिरिअड संपल्याशिवाय काढू शकत नाही. उदाहरणार्थ ई.एल. एस. एस. मधील गुंतवणूक.

 

गुंतवणूकदार – ई. एल. एस.एस. मध्ये किती लॉक इन पिरिअड असतो? लॉक इन पिरिअड संपल्यावर हा फंड आपोआप विकला जातो का आणि या फंड मध्ये जास्त परतावा मिळतो, असे ऐकले आहे हे खरे आहे का?
ई.एल.एस.एस. मधील गुंतवणूक हि केलेल्या दिवसापासून वर्षे लॉक इन पिरिअड मध्ये असते. लॉक इन पिरिअड संपल्यावर हि गुंतवणूक फक्त लॉक फ्री होते, आपोआप विकली जात नाही. ई. एल.एस.एस. मध्ये आणि नॉन ई.एल.एस.एस. स्कीम इक्विटी मार्केट मध्येच पैसे गुंतवतात त्यामुळे यातून मिळणाऱ्या परात्याव्यात फरक नाही. फरक फक्त दोन आहेत –
अ) ई.एल.एस.एस. गुंतवणुकीला वर्षाचा लॉक इन पिरिअड असतो जो नॉन ई.एल.एस.एस. ला नसतो.
ब) ई.एल.एस.एस. मद्ये आपण जी गुंतवणूक करतो त्यावर आपल्याला टॅक्‍स मध्ये सूट मिळते जी नॉन ई.एल.एस.एस.स्कीम मध्ये नाही मिळत.

गुंतवणूकदार – इक्विटी म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक विकली तर किती टॅक्‍स भरावा लागतो?
इक्विटी म्युच्युअल फंड जर एक वर्षाच्या आत विकला तर त्यातून मिळणाऱ्या फायद्यावर % शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स लागतो आणि जर एक वर्षानंतर विकला तर आजच्या इनकम टॅक्‍स रचनेनुसार मिळणाऱ्या परत्यावर टॅक्‍स लागत नाही. मग तो नॉन ई.एल.एस.एस. फंड असो वा ई.एल.एस.एस. फंड असो.

गुंतवणूकदार – मला महिने किव्हा वर्षाकरिता म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवायचे आहेत आणि जास्तीत जास्त परतावा हवा आहे. कुठल्या स्कीम मध्ये पैसे गुंतवू?
प्रत्येक गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक किती काळा करिता आहे, त्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आहे हे लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. जर गुंतवणुकीचा कालावधी महिने किव्हा वर्षचा असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक जोखमीची ठरू शकते. कारण माझ्या मते जर इक्विटी म्युच्युअल फुंडातून चांगला परतावा हवा असेल तर हि गुंतवणूक दीर्घ कालावधी म्हणजे कमीत कमी ते वर्षाकरीय करावी. छोट्या कालावधीच्या गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडात बाकीचे पर्याय उपलब्ध आहेत जसे ‘डेट फंड’ किव्हा इक्विटी सेविंग स्कीम वगैरे वगैरे.
असे आणिक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात असतात तरी गुंतवणूकदारांनी आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन एखाद्या  म्युच्युअल फंड तज्ञा कडून करून घ्यावे आणि मगच गुंतवणूक करावी. म्हणजे केलेली गुंतवणूक जोखमीची न ठरता ज्या उद्दिष्ट करिता केली आहे ते उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.

 

अभिप्राय द्या!