सोन्याच्या शाश्वत मूल्याबाबत भारतीय जनमानसांत मोठी आस्था असून, ते अनेकांसाठी महागाईच्या आघातापासून बचावायचे एक महत्त्वाचे गुंतवणूक साधन ठरले आहे. सोने गुंतवणुकीचे सार्वभौम सुवर्ण रोखे, गोल्ड ईटीएफ या सारखे मार्ग प्रचलित असले तरी त्यातून प्रत्यक्ष धातूरूपात सोने मिळविता येत नाही. तथापि थोडे थोडे पैसे जोडत दीर्घावधीत सुवर्णसंचय करण्याचा तुलनेने किफायती, सुलभ आणि सुरक्षित मार्ग ‘ऑगमाँट’ या सर्वोत्तम किमतीत सोने गुंतवणुकीचे मोबाइल अ‍ॅपने प्रस्तुत केले आहे.

देशभरातील ४००० हून अधिक घाऊक विक्रेत्यांचे सर्वात मोठे बी२बी जाळे बनून ऑगमाँट पुढे आले असून, सोने शुद्धीकरणापासून ते किरकोळ विक्रीपर्यंत अस्तित्व असलेला हा एकमेव समूह आहे. त्याचे नवीन मोबाइल अ‍ॅप हे घाऊक बाजारात सोने-चांदीची त्या त्या ठिकाणी ज्या क्षणी जी किंमत असेल त्या किमतीला खरेदी करण्याचे पारदर्शक राष्ट्रीय दालन आहे. किमान एका रुपयापासून खरेदी आणि किमान ०.१ गॅ्रम (सोने) आणि १ ग्रॅम (चांदी) घरपोच (भारतभरात कोणत्याही पिनकोड क्रमांकाच्या पत्त्यावर) मिळविण्याची सोय ऑगमॉन्टने केली आहे, अशी माहिती कंपनीचे संचालक सचिन कोठारी यांनी दिली. मोबाइल फोनवरून सिनेमाच्या तिकिटांच्या होणाऱ्या खरेदीइतकीच सुलभता आणि विश्वासार्हता सोने-चांदी खरेदीत यावी, असा हा प्रयत्न आहे. या आयओएस आणि अँड्रॉइडवर उपलब्ध झालेल्या अ‍ॅपवर नियोजनबद्ध पद्धतीने सोन्यात गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’ दालन उपलब्ध केले आहे.

अभिप्राय द्या!