काही फंड हे बाजार चढा असताना उत्तम प्रकारे कामगिरी बजावतात.

मात्र काही फंड हे बाजार पडलेला असताना गुंतवणूकदाराचे उत्पन्न चांगल्या प्रकारे सांभाळतात. या दोन्ही प्रकारच्या फंडांपैकी पर्याय निवडायला सांगितल्यास साधारणतः गुंतवणूकदार अधिक उत्पन्न देणारा फंडच निवडतात. परंतु तुम्ही तज्ज्ञांना विचारलेत तर त्यांच्या मते, असे फंड निवडतानाच बाजार पडतानाही गुंतवणुकीचे संरक्षण करू शकतील असेही काही फंड निवडावेत. केवळ आक्रमक फंडांवर भर देण्यापेक्षा चुमचा तोटा कमी करणारे फंडही निवडणे महत्त्वाचे आहे. असे फंड बाजार गर्तेत जात असतानाही संयम सोडत नाहीत आणि बाजारात घट्ट उभे राहतात. अशा स्थितीत हे फंड काही काळ अन्य फंडांच्या तुलनेत चांगली कामगिरी करणारही नाहीत कदाचित, पण ते सपशेल कोलमडणार नाहीत हे मात्र नक्की.

आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा खटाटोप हा अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आपण करत असताना असा बचावात्मक पवित्रा कशासाठी घ्यायचा?

तज्ज्ञांच्या मते, बाजार चहूबाजूंनी होरपळत असताना चांगले उत्पन्न देणारे फंड झगडत राहतात, त्याचवेळी तुलनेने कमी उत्पन्न देणारे फंड चांगले उत्पन्न देणाऱ्या फंडांइतकेच उत्पन्न बाजाराच्या पडत्या काळात देतात. कदाचित असे फंड चांगले उत्पन्न देणाऱ्या फंडांपेक्षा अधिकही उत्पन्न देऊन जातात. अशा फंडांसाठी कमी नुकसान होणे म्हणजे उसळून वर येण्यासाठी कमी ऊर्जा लागणे होय.

 

बाजाराच्या पडत्या काळात गुंतवणूकदाराला संरक्षण देणाऱ्या फंडांकडून कंपन्यांच्या भागांमध्ये गुंतवणूक करताना सावध पवित्रा घेतला जातो. त्यामुळे जोखीमही कमी होते. हे फंड चांगल्या कंपन्याच गुंतवणुकीसाठी निवडतात, त्यांचे या कंपन्यांच्या बाजारमूल्याकडे अधिक लक्ष असते. डायनॅमिक इक्विटी फंडासारख्या फंडांकडे बाजार पडताना सावरण्याची यंत्रणा असते.

म्हणून आपली काही गुंतवणूक dynamic Equity फंडामध्ये करण्यास विसरू नका !!

अभिप्राय द्या!