अपत्याच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते का?

म्युच्युअल फंडात तुम्हाला तुमच्या अज्ञान अपत्याच्या किंवा १८ वर्षे वयाखालील अपत्याच्या नावे गुंतवणूक करता येते. अशा गुंतवणुकीच्या रकमेवर कोणतेही बंधन नाही. यामध्ये अपत्याचे नाव पहिले ठेवता येते तसेच अपत्य त्याच्यासाठी तयार केलेल्या पोर्टफोलिओचे एकमेव मालक असू शकते. अशा फोलिओमध्ये दुसऱ्या कुणाचे नाव घालता येत नाही. या पोर्टफोलिओसाठी गार्डियन म्हणून त्या अपत्याचे वडील किंवा आई किंवा न्यायालयाने नियुक्त केलेली व्यक्ती असणे आवश्यक आहे.

गुंतवणुकीसाठी कोणती कागदपत्रे लागतात?

अपत्याच्या वयाचा पुरावा म्हणून वैध कागदपत्र द्यावे लागते तसेच तुमचे व अपत्याशी नाते स्पष्ट करणारा पुरावाही द्यावा लागतो. यासाठी जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट आदी दिले तरी चालतात. गुंतवणुकीच्या सुरुवातीला किंवा पोर्टफोलिओ उघडताना हे सर्व द्यावे लागते. गार्डियनला यावेळी केवायसी पूर्तता करावी लागते. गुंतवणूक पालकाच्या बँक खात्यातून होणार असेल तर त्यासाठी अपत्य व पालक यांच्याखेरीज एका व्यक्तीचे हमीपत्र द्यावे लागते. याला पर्याय म्हणून, तुम्ही ही गुंतवणूक तुमच्या अपत्याच्या बँक खात्यातून करू शकता.

अभिप्राय द्या!