मागील नऊ महिन्यांमध्ये सरकारी रोख्यांच्या उत्पन्नामध्ये (यील्ड) सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये अल्पबचत योजनांच्या तसेच पीपीएफच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. १ जानेवारीनंतर दहा वर्षांच्या सरकारी रोख्यांवरील सरासरी उत्पन्न ७.५ टक्के राहिले आहे. परिणामी, ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ अर्थात ‘पीपीएफ’ आणि अन्य प्रकारच्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ०.१५ टक्के ते ०.२० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

अभिप्राय द्या!