लाभांशाची अपेक्षा केव्हा करावी?

म्युच्युअल फंड दैनंदिन, मासिक, तिमाही किंवा वार्षिक तत्त्वावर लाभांश देऊ शकतात. लाभांश देण्याचा कालावधी योजनेनुसार बदलता असतो. कोणत्याही योजनेत लाभांश मिळण्याची खात्री देता येत नाही. मात्र बहुतांश योजना त्यांनी दिलेले लाभांश देण्याचे वचन पाळतात. तरीही, लाभांशाची रक्कम एकसमान नसते. लाभांश पर्यायांतर्गत एनएव्ही फारशी वाढत नाही आणि विशिष्ट पातळीपर्यंत एनएव्ही गेल्यास म्युच्युअल फंड लाभांश देतो. अशी कल्पना करा की, तुम्ही १४ रुपये एनएव्ही असलेल्या फंडात गुंतवणूक करून लाभांसाचा पर्याय निवडला आहे. या योजनेची कामगिरी चांगली झाली आणि एनएव्ही वाढून १६ रुपये झाली. फंडाकडून दोन रुपये लाभांश दिला जाऊ शकतो. यामुळे तुम्हाला दोन रुपये मिळतात, पण एनएव्ही पुन्हा १४ रुपये होते.

जोखीम घेण्याची तयारी नसलेल्या व परतावा मिळण्यास उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी इक्विटी फंडांच्या योजनांमध्ये लाभांशाचा पर्याय निवडण्याचा सल्ला वित्त नियोजक देतात.

ज्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करायची आहे, त्यांनी लाभांशाचा पर्याय निवडू नये, तर वृद्धी (ग्रोथ) पर्याय निवडावा. याचे कारण लाभांश अदा केल्यास चक्रवाढीचा (कम्पाउंडिंग) फायदा मिळत नाही. उच्च कराच्या कक्षेत येणाऱ्या व तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी पैसे गुंतवणाऱ्यांना लिक्विड अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडांमध्ये लाभांशाचा पर्याय निवडता येईल. याचे कारण त्यांच्या ३०.९ टक्के कराच्या तुलनेत लाभांश वितरण कर कमी असेल.

अभिप्राय द्या!

Close Menu