गृहवित्त संस्था व बँकांकडून मिळणारी अनेक प्रकारची गृहकर्जे उपलब्ध आहेत. सरकारच्या पुढाकारामुळे गेल्या दोन वर्षात ग्रामीण आणिनिमशहरी भारताच्या गरजा भागविण्यासाठी अनेक किफायतशीर गृहवित्तसंस्थांचा उदय झाला आहे. गृहकर्जामुळे घरखरेदी हफ्त्या-हफ्त्यात करणेच केवळ शक्य होते असे नाही, तर उत्पन्न कर कायद्याच्या सेक्शन 24 आणि 80सी अन्वये उत्पन्न करात व्यक्तीगत बचत करण्यासही याचा उपयोग होतो. ग्राहकांच्या विविध गरजांनुसार, गृहकर्जांचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत”

गृहखरेदीसाठीचे कर्ज

या प्रकारचे कर्ज बहुदा सर्वसाधारण प्रकारचे असते. हे सर्व प्रकारच्या कर्जदारांकडे उपलब्ध असणारे गृहकर्ज आहे. ग्राहक आपल्या रेडी टू मूव्ह किंवा बांधकामपूर्व मालमत्तेसाठी या प्रकारचे कर्ज घेऊ शकतात

गृह बांधकामासाठी कर्ज

ज्यांना आधीच बांधून घेतलेली सदनिका किंवा बंगला विकत न घेता आपल्या प्राधान्यानुसार व वैशिष्ट्यानुसार स्वतःचे घर बांधण्याची इच्छाअसते ते या कर्जाची निवड करू शकतात. या प्रकारचे कर्ज इतर गृहकर्जांपेक्षा थोडे वेगळे असते. कारण, कर्ज देणाऱ्या संस्था आपल्या घरासाठी तसेच,जमीन किंवा भूखंड खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देतातच असे नाही. याचा अर्थ, जमिनीची किंमत ही कर्जामध्ये वगळली जाते. हे फक्त जमीन मालकांसाठी लागू आहे

गृहविस्तार आणि गृह नूतनीकरण कर्ज

मोठ्या आणि सुंदर घरामध्ये राहणे हे सर्वांचे स्वप्न असते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, परिस्थितीमुळे, एखादी व्यक्ती आर्थिक संकटात असल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे खरेदीच्या वेळेस त्या व्यक्तीला हवी तशी रचना आणि सेट-अप मिळू शकत नाही. त्या नंतर एखाद्याने घर आणि नूतनीकरणासाठी कर्ज घेण्याचा विचार केला पाहिजे

पूनर्वित्तीकरण

काही विशिष्ट परिस्थितींमध्ये एखाद्याने स्वत:च्या आर्थिक बचतीसह एक मालमत्ता खरेदी केली असेल आणि त्यासोबत येणारी आर्थिक तरलता परत मिळविण्याची इच्छा असेल तर ते घर खरेदीसाठी, उभारणीसाठी किंवा विस्तारित करण्यासाठी आधीच खर्च केलेल्या रकमेची परतफेड करू शकतात. कर्ज देणाऱ्या संस्थामध्ये सामान्यत: या कर्जाच्या वर्गणीत काही कलमे असतात. या कलमांमध्ये वेळेची मर्यादा आणि कर्ज अर्जावरील मर्यादाही नमूद केलेल्या असता

गृहकर्जावरील टॉप-अप

होम लोन टॉप-अप अंतर्गत, कर्जदार आपल्या गृहकर्ज रकमेपेक्षा जास्त असलेली एक निश्चित रक्कम मिळवू शकतात. कर्जदाराचे सध्याचे गृहकर्ज ज्या संस्थेकडचे आहे, त्याच संस्थेकडे टॉप-अप कर्जासाठी अर्ज करता येतो. या कर्जाचा उपयोग कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी केला जाऊ शकतो .

गृहकर्जाच्या बॅलेंसचे हस्तांतरण

गृहकर्जाच्या शिलकीच्या हस्तांतरणामुळे ग्राहकास एका वित्तीय संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडे गृहकर्जाचे हस्तांतरण करता येते. अन्य संस्थांद्वारे दिलेल्या व्याजदरांनुसार यात बदलही करता येतो.

एखाद्याने गृहकर्जावरील व्याजदर कोणत्याही चालू योजनेसाठी किंवा चांगल्या गुणवत्तेसाठी वापरला, तर अशा कारणांसाठी दुसऱ्या कर्जाचे हस्तांतरण करता येऊ शकते. घर खरेदीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध असले तरीही योग्य कर्जाची वर्गवारी, कार्यकाल आणि कर्ज देण्याबाबत निवड करण्याआधी त्या संस्थांचा व कर्जसुविधेचा पूर्ण अभ्यास करणे आवश्यक असते. आपण घर खरेदी करतो, ती आयुष्यातली आपली एकदाच केलेली मोठी गुंतवणूक असते. त्यामुळे, ही गुंतवणूक सर्वांत सुरक्षित असणे गरजेचे आहे.

अभिप्राय द्या!