तीन वर्षांंचा लॉक—इन पिरीयड संपल्यानंतर ईएलएसएसमधून बाहेर पडणे पुरेसे नाही. शेवटी ईएलएसएस फंड्स भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करतात आणि याला न्याय देण्याच्या दृष्टीने गुंतवणुकदारांची दीर्घ कालावधीकरिता गुंतवणूक करण्यासाठी तयारी राहिली पाहिजे.

हेही लक्षात असू द्यावे की, एकदा लॉक इन कालावधी संपला, ईएलएसएस फंड हे इतर ओपन एंडेड फंडाप्रमाणेच असतात. गुंतवणुकदारांना कधीही पसंतीप्रमाणे रिडीम करणे शक्य असते. त्यासाठीच लॉक—इन कालावधीच्या शेवटी रिडीम करण्याला विशेष शहाणपणाचे नाही.तीन वर्षांंचा लॉक—इन पिरीयड संपल्यानंतर ईएलएसएसमधून बाहेर पडणे पुरेसे नाही. शेवटी ईएलएसएस फंड्स भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करतात आणि याला न्याय देण्याच्या दृष्टीने गुंतवणुकदारांची दीर्घ कालावधीकरिता गुंतवणूक करण्यासाठी तयारी राहिली पाहिजे.

दीर्घ मुदतीची समभागातील गुंतवणूक ही वृद्धी चक्र आणि भावनांमुळे फारच अस्थिर असल्याचे दिसते. तसेच इतिहासात डोकावल्यास जेव्हा तुम्ही पाच वर्षांपेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक करता— म्हणजे सात ते दहा वर्षांंकरिता, त्यावेळी तुम्ही भाग्यवान ठरू शकता आणि चांगला परतावा देखील मिळू शकतो. फक्त तुम्ही सातत्याने बाजाराच्या क्षमतेत सहभागी होऊन दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची गरज आहे.

म्हणून आत्ता ज्यांनी ELSS किंवा taxsaver फंडात गुंतवणूक केली आहे त्यांनी lock in कालावधी संपला म्हणून लगेचच बाहेर पडण्याची चूक करू नये !!

अभिप्राय द्या!