म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून खरेदी करण्याला इतकी पसंती का मिळते?

गुंतवणूकदारांना वेळ नसल्यामुळे त्यांना थेट कंपन्यांचे भाग खरेदी केल्यास त्याचा मागोवा घेणे अवघड जाते. त्यांच्या बदलणाऱ्या किंमती, या कंपन्यांना होणारा नफा-तोटा तसेच या कंपन्यांचे भाग विकण्याचा अचूक वेळी घ्यावा लागणारा निर्णय हे सारे पाहणे त्यांच्यासाठी कटकटीचे असते. या तुलनेत म्युच्युअल फंड हे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांकडून राखले जातात. हे फंड व्यवस्थापक नियमित तत्त्वावर या कंपन्यांविषयी संशोधन करतात, त्यांच्या कामगिरीचा मागोवा घेतात, त्यांचे मूल्यांकन करतात. विविध उद्योग क्षेत्रे आणि कंपन्या यांचे मूल्यांकन फंड व्यवस्थापकांकडून नियमितपणे केले जाते. यामुळे एखाद्या फंड व्यवस्थापकाने अमुक कंपनीच्या भागांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यास तो संशोधनाच्या आधारे घेतलेला असतो. अनेक गुंतवणूकदार त्यांच्याकडे येणाऱ्या स्टॉक-टिप्सना किंवा बाजारातील एखाद्या मताच्या लाटेला बळी पडतात. त्यामुळे ते पुरेसे संशोधन न करता, जोखीम न पाहता भाग खरेदी-विक्रीबाबत निर्णय घेऊन टाकतात. कोणताही भाग खरेदी करण्यापूर्वी फंड व्यवस्थापक त्याचे संपूर्ण मूल्यांकन करतो. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही असतात.

तुम्हाला ५०० रुपये इतक्या कमी रकमेने सुरुवात करता येते. या रकमेतून तुम्ही थेट कंपन्यांचे भाग खरेदी करू शकता, पोर्टफोलिओ तयार करू शकता. तुम्हाला एकगठ्ठा रक्कम गुंतवूनही म्युच्युअल फंडात भागखरेदी करता येते किंवा तुम्ही दरमहिना एसआयपीद्वारे रक्कम गुंतवू शकता. म्युच्युअल फंडांचे युनिट घेण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट खाते असलेच पाहिजे असा काही नियम नाही. अनेक ब्लूचिप कंपन्या भागांच्या किंमती वाढवतात. मग अशा किंमतीनी एक भाग खरेदी केला तरीही तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागते. म्युच्युअल फंडातून हाच भाग खरेदी करताना इतकी किंमत मोजावी लागत नाही. 

येत्या नववर्षाचा संकल्प म्हणून एक तरी SIP आपणही सुरु करावी हीच धनलाभची इच्छा !!

अभिप्राय द्या!