मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंडाला  दोन दिवसापूर्वी -मंगळवारी -दहा वर्षे पूर्ण झाली . ४ एप्रिल २००८ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झालेल्या या फंडात नियोजनबद्ध ‘एसआयपी’ गुंतवणूक केलेल्यांना या फंडाने भरभरून परतावा देत संपत्तीची निर्मिती केली आहे. या फंडात मागील दहा वर्षे दरमहा ५ हजारांची नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या ६ लाखांचे २८ मार्च २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १५.३१ लाख रुपये झाले असून परताव्याचा दर १७.९२ टक्के आहे. पहिल्या एनएव्हीला केलेल्या १ लाखाच्या गुंतवणुकीचे २८ मार्च २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ४.४३ लाख रुपये झाले आहेत. दहापैकी ७ वर्षे या फंडाला ‘व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन’ने ‘फोर स्टार’ तर ‘मॉर्निगस्टार इंडिया’ने ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग दिले आहे. मिरॅ अ‍ॅसेट इंडिया अपॉच्र्युनिटी फंडाचे १ मार्च २०१८ नंतर ‘मिरॅ असेट इंडिया इक्विटी फंड’ असे नामांतर झाले आहे.

लार्ज कॅप ओरिएंटेड डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड गटात हा फंड दमदार कामगिरीमुळे पाच आणि तीन वर्षे ‘एसआयपी’ परताव्याच्या यादीत आपले अव्वल स्थान क्रिसिल रँकिंगमध्ये अबाधित राखून आहे. या फंडाचा संदर्भ निर्देशांक ‘बीएसई २००’ असून ४० पैकी ३७ तिमाहीत या फंडाची कामगिरी संदर्भ निर्देशांकाहून अव्वल राहिली आहे.

अन्य फंडांच्या तुलनेत मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंडाच्या ‘एनएव्ही’तील चढ-उतार कमी असल्याने डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड गटाच्या सरासरी शार्प रेशोपेक्षा मिरॅ अ‍ॅसेट इंडिया इक्विटी फंडाचा शार्प रेशो मोठा आहे. गोपाल अग्रवाल यांच्यानंतर या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा नीलेश सुराणा यांच्याकडे आली. सध्या या फंडाच्या व्यवस्थापनात हर्षद बोरावके हे नीलेश सुराणा यांना साहाय्य करीत आहेत.

आपणही या फंडात दीर्घ मुदतीसाठी एखादी SIP सुरु करावी हा सल्ला !!

अभिप्राय द्या!