घर घेताना खालील काळजी घ्या

  • करार पूर्णपणे वाचून त्यातील बिल्डर व तुमच्या जबाबदाऱ्या नीट समजून घ्या. प्रोजेक्ट वेळेवर झाले नाही तर काय होईल हा अंदाज पहिला बांधा.

  • आपल्या गृहकर्जावर आपले नियंत्रण ठेवा. प्रोजेक्टची प्रगती जर नसेल तर बँकेला नोटीस देऊन कर्ज वाटप बंद करा.

  • प्रोजेक्टचे टायटल सर्च कर्ज देणाऱ्या संस्थेने केले आहे याची खात्री करून घ्या.

– योजनांची नीट चौकशी करा. प्रलोभनांना बळी पडू नका.

  • बांधकाम चालू असलेल्या प्रोजेक्टच्या प्रगतीवर नीट लक्ष ठेवा.

  • बांधकाम पूर्ण झालेले आणि ओसी मिळालेले प्रोजेक्ट महाग असले तरी जोखीम कमी असते, परंतु बांधकाम सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये घेतलेले घर महाग पडू शकते.

  • घर घ्यायच्या आधी आपले आर्थिक नियोजन करा. शक्यतो मिळकतीच्या ४० टक्क्य़ांपेक्षा जास्त रक्कम कर्जाच्या हफ्त्यामध्ये जाणार नाही असे बघा.

  • सहा महिन्याचे कर्जाचे हफ्ते सुरक्षित फंडामध्ये गुंतवून ठेवा, म्हणजे नोकरी सुटली तर कर्जाची परतफेड वेळेवर होईल.

  • गृह कर्ज घेताना आपला मुदत विमा काढायचा लक्षात ठेवा.

  • सबव्हेन्शन स्कीममध्ये कर्ज घेताना बिल्डरने भरलेल्या ईएमआयचा तुमच्या आयकर विवरणात कसा उल्लेख होईल आणि तुमची कर जबाबदारी ध्यानात घ्या.

  • जगात काही फुकट मिळत नसते. ‘फुकट’ हा शब्द दिसल्याबरोबर धोक्याची घंटा वाजलीच पाहिजे..

अभिप्राय द्या!