भारताच्या पसंतीचा स्वतंत्र डायरेक्ट म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म असणाऱ्या क्लियरफंड्सने आज डायरेक्ट प्रिमियम स्मार्ट पोर्टफोलिओ सेवा सुरू करताना जाहीर केले की,सर्व गुंतवणूकदारांना डायरेक्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक अगदी मोफत करता येईल.

Clearfunds.comचे संस्थापक आणि सीईओ कुणाल बजाज यांनी याबाबत  सांगितले की, “आम्ही आमची कार्यप्रणाली स्वयंचलित बनवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डायरेक्ट म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांसाठी मोफत सेवा देऊ शकणार आहोत.

आम्ही आता काही काळासाठी हे लक्ष्य निर्धारीत करत आहोत, कारण आमचा विश्वास आहे की गुंतवणुकीची संधी ही प्रत्येकासाठी संपत्ती किंवा उत्पन्नाचा विचार न करता सुलभ प्रकारे उपलब्ध असावी. आमचे अत्याधुनिक आणि सर्व कसोटीना पात्र अल्गोरिदम, सर्व गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत. लाखो डेटा पॉईंट्सच्या माध्यमातून आपल्या विशिष्ट लक्ष्यांसाठी सर्वोत्तम म्युच्युअल फंडाची शिफारस करण्यात येईल.

तुमच्या ठिकाणावरून गुंतवणुकीची प्रक्रिया अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी आम्ही आमची कार्यप्रणालीही सुलभ बनवली आहे. कागदपत्रांच्या क्लिष्ट जंजाळाशिवाय तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत तुमच्या अकाऊंटची नोंदणी करू शकता.

यासोबतच आमच्या संपूर्ण मोफत शिफारशीबरोबर आमच्याकडून बचतीच्या उद्दिष्टांबाबत अधिक विस्तृत मार्गदर्शन आणि मदतीची अपेक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी स्मार्ट पोर्टफोलियो सेवाही सुरु केली आहे.’’

क्लियरफंड्स स्मार्ट पोर्टफोलियोज ही प्रत्येकासाठी गुंतवणूक प्रक्रिया सुलभ बनवण्यासाठी तयार केलेली संपूर्णपणे स्वयंचलित मार्गदर्शन सेवा आहे. क्लियरफंड्सकडून कॉम्प्यूटर अल्गोरिदमवर आधारीत तंत्रज्ञान वापरून कर्ज खात्यांचा समतोल पाहण्यासोबतच, इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूक पोर्टफोलिओज बनवले जातात.

 

अभिप्राय द्या!