खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरांत वाढ केली आहे. या बँकेने एक कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर .०१ ते एक टक्क्यापर्यंत वाढ देऊ केली आहे. यामुळे एचडीएफसीच्या मुदत ठेवींवरील व्याजदराने स्टेट बँक तसेच अन्य अनेक बँकांच्या व्याजदरांना मागे टाकले आहे.

सुधारित व्याजदरानुसार एचडीएफसी बँकेत एक वर्षांच्या मुदत ठेवीवर ६.८५ तर एक वर्ष व १७ दिवस ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी सात टक्के व्याज मिळेल. त्यापुढे पाच वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठीही सात टक्के व्याज मिळेल. यापूर्वी या ठेवींवर सहा ते सव्वासहा टक्के व्याज मिळत होते.

अभिप्राय द्या!