दीर्घ काळासाठी संपत्तीची निर्मिती करायची झाल्यास इक्विटीला पर्याय नसल्याचे अनेक गुंतवणूकदारांना वाटते. कंपन्यांचे भाग थेट खरेदी केल्यास त्यांच्या बदलणाऱ्या किंमतींकडे लक्ष देणे अवघड वाटू शकते. म्हणून गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून इक्विटीत गुंतवणूक करतात…

कंपन्यांचे भाग थेट खरेदी करण्यापेक्षा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून खरेदी करण्याला इतकी पसंती का मिळते?

गुंतवणूकदारांना वेळ नसल्यामुळे त्यांना थेट कंपन्यांचे भाग खरेदी केल्यास त्याचा मागोवा घेणे अवघड जाते. त्यांच्या बदलणाऱ्या किंमती, या कंपन्यांना होणारा नफा-तोटा तसेच या कंपन्यांचे भाग विकण्याचा अचूक वेळी घ्यावा लागणारा निर्णय हे सारे पाहणे त्यांच्यासाठी कटकटीचे असते. या तुलनेत म्युच्युअल फंड हे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांकडून राखले जातात. हे फंड व्यवस्थापक नियमित तत्त्वावर या कंपन्यांविषयी संशोधन करतात, त्यांच्या कामगिरीचा मागोवा घेतात, त्यांचे मूल्यांकन करतात. विविध उद्योग क्षेत्रे आणि कंपन्या यांचे मूल्यांकन फंड व्यवस्थापकांकडून नियमितपणे केले जाते. यामुळे एखाद्या फंड व्यवस्थापकाने अमुक कंपनीच्या भागांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यास तो संशोधनाच्या आधारे घेतलेला असतो. अनेक गुंतवणूकदार त्यांच्याकडे येणाऱ्या स्टॉक-टिप्सना किंवा बाजारातील एखाद्या मताच्या लाटेला बळी पडतात. त्यामुळे ते पुरेसे संशोधन न करता, जोखीम न पाहता भाग खरेदी-विक्रीबाबत निर्णय घेऊन टाकतात. कोणताही भाग खरेदी करण्यापूर्वी फंड व्यवस्थापक त्याचे संपूर्ण मूल्यांकन करतो. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही असतात.

त्यामुळे सामान्य गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हितावह आहे !!

अभिप्राय द्या!