एसबीआय स्मॉल अॅँड मिडकॅप फंडातली गुंतवणूक ऑक्टोबर 2015 मध्ये थांबवण्यात आली होती. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना 16 मे पासून या फंडात गुंतवणूक करता येणार आहे. 
 
या फंडाचं नाव आता एसबीआय स्मॉलकॅप फंड असं असणार आहे. गुंतवणूकदारांना प्रति महिना आणि प्रति पॅन कार्ड रु. 25,000 गुंतवणूक करता येणार आहे. स्मॉलकॅप फंडातील गुंतवणूकदारांच्या वाढत्या कलामुळे गुंतवणूकीचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला होता. 
परंतु यामुळे फंडातील गुंतवणूकीला हाताळणे तसेच त्यात संधी खालावल्या होत्या. त्यामुळे बऱ्याचशा स्मॉलकॅप फंडांनी गुंतवणूक स्वीकारणं थांबवलं आहे. एसबीआय स्मॉलकॅप फंड हा अशा प्रकारातला पहिला फंड आहे ज्यात पुन्हा गुंतवणूक सुरू करण्यात आली आहे. 
या फंडाची 750 कोटी रुपयांची क्षमता असल्यामुळे गुंतवणूक थांबवण्यात आली होती. सेबीने अलीकडेच म्युच्युअल फंडांच्या वर्गवारीबद्दल काही सूचना केल्या आहेत. त्या नवीन नियमावलीनुसार आता फंड स्मॉलकॅप या प्रकारात येतो.
 
नवीन नियमांनुसार स्मॉलकॅप फंडांना ज्या कंपन्या बाजारमुल्यानुसार 251व्या स्थानावर आहेत, त्यांच्यात गुंतवणूक करता येणार आहे. सद्य परिस्थितीत स्मॉलकॅप फंडांना उच्च बाजारमूल्य असणाऱ्या आणखी 150 कंपन्यांमध्ये गुंतवणूकीची संधी मिळणार आहे. 
त्यामुळे या फंडातून फक्त एसआयपीद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणूकीचा स्वीकार केला जाणार आहे.
 
 आर श्रीनिवासन या फंडाचे फंड मॅनेजर असून हा फंडाची गणना उत्तम परतावा देणाऱ्या फंडांमध्ये केली जाते. मागील एका वर्षात या फंडाने 35.2 टक्कयांचा परतावा दिला आहे. तर मागील पाच वर्षांसाठीचा या फंडाचा परतावा 36 टक्के इतका आहे. मागील तीन वर्षात स्मॉलकॅप आणि मिडकॅप फंडाकडे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू लागले आहेत. गुतंवणूकीचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे या प्रकारातील फंडांनी गुंतवणूक स्वीकारणे थांबवले होते.

अभिप्राय द्या!