श्रीमंत व्हावं, असं कोणाला वाटत नाही?
पण, या जगात कोणीही अपघाताने श्रीमंत होत नाही. संपत्ती निर्माण करण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टी करण्याचा निश्‍चय करावा लागतो. यासाठी सर्वांत आधी आपल्या मानसिकतेत करावा लागणारा बदल महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने श्रीमंत होण्यासाठी जे काही नियम आणि सवयी पाळण्याची गरज असते, त्यावर एक नजर टाकूया.
 
 
“मला हे इतक्‍यात शक्‍य नाही. पुढील वर्षी पगारवाढ झाल्यावरच मी गुंतवणूक करीन,” हे वाक्‍य आपण अनेकांच्या तोंडून ऐकलेलं आहे. कोणत्याही गोष्टीत दिरंगाईची सवय वाईटच. मात्र, गुंतवणुकीबाबत दिरंगाई केल्यास आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, त्यामुळे गुंतवणुकीला सुरवात करण्यास उशीर करू नये. तुम्ही जेवढा उशीर कराल, तेवढी परिस्थिती तुमच्या विरोधात जाईल. चक्रवाढ पद्धतीचा परिणाम दिसून येण्यासाठी काही वेळ जावा लागतो. यामुळेच आता पुढची पगारवाढ होण्याची वाट पाहू नका. याउलट जसजसे तुमचे उत्पन्न वाढेल, तसतशी गुंतवणुकीची रक्कम वाढवा. तुम्ही जेवढा उशीर कराल, तेवढा तुम्हाला त्या रकमेचा फायदा मिळण्यास उशीर होईल. तुम्ही दहा वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या दरमहा दोन हजार रुपये गुंतवणुकीचे मूल्य हे तुम्ही पाच वर्षांमध्ये दरमहा गुंतवलेल्या चार हजार रुपयांच्या गुंतवणुकीपेक्षा नेहमीच जास्त असेल. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्‍स) गेल्या 36 वर्षांत 16 टक्के (सीएजीआर) दराने परतावा (उत्पन्न) दिला आहे. मात्र, ज्या वेगाने सध्या भारताचा आर्थिक विकास होत आहे, तो लक्षात घेता तुम्हाला निश्‍चितच यापेक्षा चांगला परतावा मिळू शकतो. थोडक्‍यात सांगायचे, तर गुंतवणुकीला आताच सुरवात करा!
कशी ?  ती धनलाभ च्या संकेतस्थळावरून पहा !!

अभिप्राय द्या!