1. युनोच्या लोकसंख्यावाढीच्या अभ्यासानुसार माणसाचे सरासरी आयुष्य हे २०५० पर्यंत ७५ वर्षे होणार आहे.

त्यामुळे प्रत्येकाला वाढत्या माहागाईला तोंड देण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न हे करावेच लागतात. राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना ही सर्वांसाठी सन २००८ पासून सुरु झाली असून केंद्र सरकार सन २०१७/२०१८ पर्यंत काही रक्कम प्रोत्साहन म्हणून हे खाते उघडणाऱ्या व्यक्तीला देणार आहे.

हे खाते उघडणाऱ्या प्रत्येकाला Permenent Retirement Account Number (PRAN) प्राप्त होतो व तो कायमस्वरूपी राहतो.

यामधे Tier I Account व Tire II Account अशी दोन प्रकारची खाती असतात. Tire I मधून भरलेले पैसे निवृत्ती पर्यंत काढण्याचा पर्याय नसतो. Titre II साठी अधून मधून पैसे काढणे शक्य असते, तथापि यात करसवलत मिळत नाही.

PFRDA ही स्वायत्त संस्था या अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन करते. पोस्ट ऑफिस सह ५८ संस्थांना अशाप्रकारच्या निवृत्ती योजनेअंतर्गत पैसे स्विकारण्याची मान्यता दिली असून या संस्थांना POPS म्हणतात व या खात्यांचा ताळमेळ NSDL तर्फे पाहिला जातो.

फायदे:-

१) ही एक स्वायत्त संस्थेतर्फे चालविण्यात येणारी पारदर्शी योजना आहे.

२) PRAN क्रमांक मिळवून याचे सदस्य होता येते.

३) कर्मचारी जरी बदली होऊन दुसरीकडे गेला तरी त्याचा PRAN न बदलल्याने यासंबंधीतील व्यवहार करण्यामधे सुलभता आहे.

कर सवलत:-

·         यामधे गुंतविलेल्या निधीवर 80 C करसवलत काही अटींच्या अधीन राहून प्राप्त होऊ शकते, तसेच सरतेशेवटी मिळणारे मुद्दल हे ‘tax free’ असते.

·         पैसे ठेवणे किंवा काढणे यासाठी या खातेधाराकाकडून काही शुल्क आकारणी होते.

·         “सेवा करही” आकारण्यात येतो.