आजकाल सामान्य नोकरदार सुध्दा भरघोस पगारामुळे Income Tax भरणा करण्याच्या छत्राखाली येऊ शकतो.
गेल्या वर्षी किंवा याही वर्षी करभरणा करण्याच्या स्लॅबमध्ये भरघोस सवलत मिळेल असे वाटत होते पण……
इन्कमटॅक्स Act कलम 80 C अंतर्गत आपण विविध योजनांमधे रु. १.५० लाख पर्यंतची गुंतवणूक केल्यास तेवढी रक्कम आपणास “कर सवलत” या सदराखाली गृहीत धरता येते हे जवळ जवळ सर्वांना माहिती आहे.
आर्थिक वर्षाच्या शेवटी कोणीही पगारदार व्यक्ती ही सवलत घेण्यासाठी PPF खाते, N.S.C किंवा जीवन विमा फार झाले तर ५ वर्षे बँकेतील ठेवी यामधे गुंतवणूक करून ही सवलत प्राप्त करून घेतो.
पण या बचतीतून म्हणावा तेवढा परतावा मुदतींती मिळत नाही व काही योजनांमधे तर उद्गमकर कपातही होते.
सार्वजनिक निर्वाह निधीतील रक्कम हवी तशी व हवी तेव्हा काढताही येत नाही. या दृष्टीने म्युचुअल फंडातील ELSS योजना शेअरबाजारासंबंधीत योजना असल्याने भरघोस परताव्यासह टॅक्स बचतही करून देतात.