केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुद्रा कर्ज योजनेला आता खासगी कंपन्यांचे बळ मिळणार आहे. या योजनेचा अधिकाधिक विस्तार व्हावा व सर्वसामान्य व्यावसायिकांपर्यंत ती सहज पोहोचावी या हेतूने ४० खासगी कंपन्या वा आर्थिक संस्थांशी केंद्र सरकार हातमिळवणी करणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली.

केंद्र सरकारने आठ एप्रिल २०१५पासून मुद्रा योजना सुरू केली असून त्या अंतर्गत बिगर कृषी, बिगर व्यावसायिक गटातील लघू उद्योजकांना दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकांच्या माध्यमातून मिळते. मात्र चांगला व्यवसाय करणाऱ्या व रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ४० खासगी कंपन्या व आर्थिक संस्थांची सरकारने निवड केली असून त्यांच्या माध्यमातूनही हे कर्ज मिळू शकेल. हे कर्ज सरकारच देणार असून या कंपन्या मध्यस्थाची भूमिका पार पाडतील. या कंपन्यांमध्ये पतंजली, अॅमेझॉन, मेक माय ट्रिप, झोमॅटो, बिग बास्केट, मुथ्थुट आदी कंपन्यांचा समावेश आहे.

अभिप्राय द्या!