बरोडा पायोनियर ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने डेट फंडातील ‘बरोडा पायोनियर अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड’ नावाने नवीन योजना गुंतवणुकीसाठी बाजारात सादर केली आहे. डेट ओपन एंडेड प्रकारातील योजनेचा एनएफओ (न्यू फंड ऑफर) २४ मे पासून ते २९ मे पर्यंत उपलब्ध असणार आहे. योजनेचा एनएफओ खरेदी करण्यासाठी कमीत कमी ५००० रुपयांची गुंतवणूक बंधनकारक आहे. 
 
नवीन योजना ३ ते ६ महिन्यांच्या गुंतवणूक कालावधी असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे. या योजनेतीळ गुंतवणूक प्रामुख्याने सरकारी व कॉर्पोरेट  सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जाणार आहेत. ऍसेट अलोकेशनच्या मर्यादेत राहून टी- बिल्स, कमर्शिअल पेपर्स, कॉर्पोरेट रोखे अशा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये योजनेचे व्यव्थापन केले जाणार आहे. या नवीन योजनेसाठी एन्ट्री किंवा एक्झिट लोड आकारण्यात येणार नाही. 
 
बरोडा पायोनियर अंतर्गत फिक्स्ड इन्कम विभागाचे प्रमुख अलोक साहू आणि डेट फंडाचे व्यवस्थापक हेतल शाह हे या नवीन योजनेचं व्यवस्थापन करणार आहेत. 

अभिप्राय द्या!

Close Menu