
आपल्या आयुष्यात नियमितपणाचे फायदे किती असतात हे आपण जाणतो. व्यायाम, आहार इत्यादी अनेक बाबींमध्ये नियमित आणि शिस्तीने वागल्यास होणारे लाभ खूप असतात. आणि हा नियमितपणा जर दीर्घ काळ सांभाळता आला तर? अर्थात अनेकपट कमाई! गुंतवणुकीतही हेच तत्त्व लागू पडते. पावसाळा, थंडी, उन्हाळा अशा सर्व मोसमात व्यायाम करणाऱ्याच्या पदरात उत्तम प्रकृतीचे फळ पडते; तसेच नियमित आणि शिस्तीने गुंतवणूक करणाऱ्यांनाही आर्थिक लाभाचे फळ मिळते, असे दिसून येते. आणि अर्थातच फक्त थोड्या दिवसांसाठी हे न करता अनेक वर्षे ही गुंतवणूक केल्यास होणारा लाभ लक्षणीय असतो.
भारतीय गुंतवणूकदार हा खूप लाभ थोड्या काळात मिळण्याची अपेक्षा करतो. त्यामुळे जास्त मुदतीसाठी (बॅंक मुदत ठेवी सोडून) भांडवल बाजारात गुंतवणूक करण्याकडे त्यांचा कल नाही. पण अनेक अभ्यास पाहणीनंतर असे दिसून आले आहे, की जेवढे दिवस तुम्ही जास्त गुंतवणूक करता त्या प्रमाणात तुम्हाला त्याचे फळ मिळण्याची शक्यता वाढते. म्युच्युअल फंडांचे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता खूप लोकप्रिय झाले आहेत. दर महिना ठराविक रक्कम म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवून, एकदम गुंतवलेल्या रकमेच्या तुलनेत जोखीम खूप कमी करता येणारीही योजना आहे.
महागाईशी मुकाबला
वाढत्या महागाईपेक्षा जास्त दराने परतावा इक्विटी शेअर्समधली गुंतवणूक देऊ शकेल. गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने वार्षिक सरासरी 14 ते 16 टक्के एवढा परतावा दिला आहे; ज्या काळात महागाईचा दर 6 ते 8 टक्के होता. अनेक प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांत केलेली गुंतवणूक जोखीम कमी करते. आणि अशी गुंतवणूक एकदम न करता दीर्घकाळपर्यंत, नियमित गुंतवणुकीच्या मार्गाने (एसआयपी) केल्यास हा धोका अजूनही कमी होऊ शकतो. पण ही मर्यादा लक्षात घेऊनही अल्प किमतीत मिळणाऱ्या आयुर्विम्याच्या रक्षणाचा विचार करता ही योजना गुंतवणूकदारांना इक्विटी योजनेतल्या वृद्धीचे लाभ देऊ शकेल.
nav kasa calculate kela jaato
जेव्हा एखादा NFO सुरु होतो तेव्हा त्याची NAV रु १० /-प्रती युनिट असते. त्या फंडामध्ये समभागांची खरेदी व विक्री करून जो फायदा होतो तो मिळविला जातो आणि एकंदर रक्कम हि प्रती युनिट किती वाढली आहे ते जाहीर होते त्यालाच त्या दिवसाची NAV म्हणतात.