डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाने नवा फंड बाजारात दाखल केला आहे. ‘डीएसपी ब्लॅकरॉक – एफएमपी सिरीज -२३१-३एम’ असे या फंडाचे नाव आहे. नवीन योजना क्लोज एंडेड – इनकम फंड प्रकारातील आहे. या फंडांतर्गत गुंतवणूक करण्यासाठी नवी फंड ऑफर (एनएफओ) जाहीर करण्यात आली असून ही ऑफर फक्त आजच्या दिवसासाठी (३१ मे) खुली राहणार आहे. एनएफओ काळात गुंतवणूक करण्यासाठी एका युनिटची दर्शनी किंमत 10 रुपये आहे. योजनेचा एनएफओ खरेदी करण्यासाठी कमीत कमी ५००० रुपयांची गुंतवणूक बंधनकारक आहे. 
 
डीएसपी ब्लॅकरॉक – एफएमपी सिरीज -२३१-३एम’ या योजनेअंतर्गत फंडात गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यानंतर हे पैसे फंडातर्फे प्रामुख्याने सरकारी व राज्य विकास सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जाणार आहेत.ऍसेट अलोकेशनच्या मर्यादेत राहून टी- बिल्स, रेपो, रिव्हर्स रेपो आणि सीबीएलओ अशा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये योजनेचे व्यव्थापन केले जाणार आहे. ३ ते ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी ही योजना जाहीर केली आहे. 
 
लौकिक बागवे आणि पंकज शर्मा हे या फंडाचे व्यवस्थापन करणार आहेत.  

अभिप्राय द्या!