म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये आपल्या कामगिरीने गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड समूहाने गुंतवणूकदारांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. ‘आदित्य बिर्ला सनलाईफ फिक्स्ड टर्म प्लॅन- सिरीज क्यू बी (१११३ दिवस)’ नावाने हि योजना आहे. नवीन योजना क्लोज एंडेड – हायब्रीड फंड प्रकारातील आहे. या फंडाचा एनएफओ १ जून पासून ६ जून पर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. योजनेचा एनएफओ खरेदी करण्यासाठी कमीत कमी १००० रुपयांची गुंतवणूक बंधनकारक आहे. 
 
‘आदित्य बिर्ला सनलाईफ फिक्स्ड टर्म प्लॅन- सिरीज क्यू बी (१११३ दिवस)’ क्रायसिल कॉम्पोझिट फंड बेंचमार्कानुसार कमीत कमी ५० टक्के गुंतवणूक गिल्ट फंडामध्ये तर उर्वरित गुंतवणूक लघु आणि दीर्घकालीन सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जातात. कमी जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही गुंतवणूक करता येणार आहे.
 
या योजनेअंतर्गत फंडात गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यानंतर हे पैसे फंडातर्फे प्रामुख्याने सरकारी व राज्य विकास सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जाणार आहेत.ऍसेट अलोकेशनच्या मर्यादेत राहून टी- बिल्स, रेपो, रिव्हर्स रेपो आणि सीबीएलओ अशा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये योजनेचे व्यव्थापन केले जाणार आहे. १११३ दिवसांच्या कालावधीसाठी ही योजना जाहीर केली आहे. 

अभिप्राय द्या!

Close Menu