भारतीय अर्थव्यवस्था चार वर्षांपूर्वी जगात दहाव्या स्थानावर होती. आजमितीला ती ब्रिटनच्याही पुढे, पाचव्या स्थानावर आहे. या काळात बॉलिवूड चित्रपटांची बॉक्‍स ऑफिसवरील कमाई 400 कोटींवरून 1100 कोटींवर गेली, ग्रामीण भागात ट्रॅक्‍टरची विक्री अत्युच्च पातळीवर पोचली आहे. लोकांची क्रयशक्ती वाढल्याचे हे निदर्शक आहेत. या पार्श्‍वभूमीवर दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकीत नक्कीच भरभरून परतावा मिळेल, असे कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांनी सांगितले.

आयसीआयसीआय म्युच्युअल फंडाचे अर्थ सल्लागार हितेश माळी यांनी पुढील पंधरा वर्षे भारतासाठी चांगली व सुखसमृद्धीची असतील असे सांगत शेअरबाजाराचा निर्देशांक बघण्यापेक्षा देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न कसे वाढते आहे हे बघणे आवश्‍यक आहे, असे सांगितले.

अभिप्राय द्या!