म्युच्युअल फंडांच्या अतिरिक्त भारात (अॅडीशनल एक्सपेन्सेस) घट झाल्याने त्याचे फायदे गुंतवणूकदारांना देण्यात यावेत, अशी सूचना अॅम्फीने गुंतवणूकदारांना दिली आहे. 
 
सेबीने नुकतीच अतिरिक्त भारात कपात केली आहे. 29 मे रोजी सेबीने यासंदर्भातली सूचना म्युच्युअल फंड कंपन्यांना दिली होती. अतिरिक्त भार आता 20 बेसिस पॉईंट्सवरून 5 बेसिस पॉईंट्स पर्यंत कमी करण्यात आला आहे. यामागे गुंतवणूकदारांचे हित साधले जात गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे असा सेबीचा हेतू आहे. 
 
बेसिस पॉईंट्स कमी केल्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा खर्च कमी होणार आहे. अॅम्फीने यासंदर्भात म्युच्युअल फंड कंपन्यांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रात अतिरिक्त भार 15 बेसिस पॉईंट्सने कमी झाल्यामुळे, वितरकांना देण्यात येणारे कमिशन कमी करतानाच यामुळे होणारा फायदा ग्राहकांपर्यत पोचवण्यात यावा अशी सूचना करण्यात आली आहे.
वितरकांना देण्यात येणाऱ्या कमिशनची पुनर्रचना केली जावी असेही अॅम्फीने सांगितले आहे. म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक जास्तीत जास्त पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी सेबी आणि अॅम्फी प्रयत्नशील आहेत.

अभिप्राय द्या!