जीएसटी लागू झाल्यानंतर डळमळीत झालेली भारताची अर्थव्यवस्था पुन्हा सावरली आहे. येत्या एक-दोन वर्षात जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था टॉपवर असेल, असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ७.३ टक्के राहणार असला तरी येत्या दोन वर्षात जीडीपी ७.५ टक्क्यांवर पोहोचणार असल्याचा अंदाजही जागतिक बँकेने वर्तवला आहे.

जागतिक बँकेने ‘ग्लोबल इकॉनॉमिक्स प्रॉस्पेक्टस’ अहवाल जाहीर केला आहे. त्यात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षात भारताच्या जीडीपीवर परिणाम करणारे सर्व फॅक्टर संपुष्टात आले आहेत. त्यामुळे भारताचा आर्थिक वृद्धी दर वेगाने वाढणार असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे. या अहवालानुसार भारतात गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगलं वातावरण असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अभिप्राय द्या!