सेबीच्या नवीन नियमांनुसार प्रत्येक योजनांचे ‘एक्सपेन्स रेशो’ जाहीर करणे म्युच्युअल फंडांना कंपन्यांना बंधनकारक करण्यात येईल. एकाच योजनेतील रेग्युलर आणि डायरेक्ट योजनांचे एक्सपेन्स रेशो देखील वेगळे दाखवावे लागणार आहेत. ही सर्व माहिती दररोज वेबसाईटवर प्रकाशित करण्यासंबंधीच्या सूचना म्युच्युअल फंड कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक नवीन ‘टॅब’ वेबसाईटवर देण्यात येईल.
 
म्युच्युअल फंड कंपन्या एक्सपेन्स रेशो ठरवताना किंवा त्यात बदल करताना गुंतवणूकदारांना कुठलीही माहिती देत नसल्याचे सेबीला आढळून आले आहे. तसेच एक्सपेन्स रेशोमध्ये वारंवार बदल करण्यात येत असल्याचे देखील निदर्शनास आल्याने सेबीने व्यवहाराच्या पारदर्शकतेसाठी कडक पावले उचलली आहेत. तसेच म्युच्युअल फंडांना योजनेच्या एक्सपेन्स रेशोमध्ये काही बदल करावयाचे असतील तर कमीत कमी ३ दिवस अगोदर गुंतवणूकदारना ई-मेल किंवा एसेमेसद्वारे कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

अभिप्राय द्या!