इन्व्हेस्को म्युच्युअल फंडाने शेअर बाजारातील अनिश्‍चित वातावरणातील जोखीम मर्यादीत ठेवून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणारा

“इन्व्हेस्का इंडिया इक्विटी बॉंड अँड फंड”

ही नवीन गुंतवणूक योजना आणली आहे. येत्या 11 जून रोजी ही योजना खुली होणार असून 25 जूनपर्यंत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येईल. इक्विटी म्युच्युअल फंडांची विस्तृत श्रेणी असलेल्या इन्व्हेस्कोच्या या नव्या योजनेत इक्विटीत 65 ते 80 टक्के आणि बॉंडमध्ये 20 ते 35 टक्के या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. इक्विटीतील तेजीचा गुंतवणूकदारांना फायदा मिळेल तसेच बॉंडमुळे गुंतवणूक सुरक्षित राहील आणि स्थिर परतावा मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. या फंडाचे व्यवस्थापन ताहेर बादशाह आणि अमित गणात्रा यांच्याकडून केले जाते. इन्व्हेस्कोचे 120 देशांमध्ये गुंतवणूकदार असून कंपनी 937.6 अब्ज डॉलर मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे.

अभिप्राय द्या!