युटीआय म्युच्युअल फंडा तर्फे सर्वात जुनी परंतू परताव्यात सातत्य असणारी युलिप (Unit Link Insurance Plan) ही एक अत्यंत सुंदर अशी योजना आहे. ज्यांना जीवन विमा संरक्षणासह भांडवल वृध्दिचाही लाभ अपेक्षित आहे अशा सर्वांसाठी ही अत्यंत सुंदर अशी योजना आहे. गेली ४५ वर्षे ही योजना कार्यान्वित असून यामध्ये मिळणाऱ्या परताव्याचा दर हा ११% पेक्षा जास्तही राहू शकतो. याच नावाने अन्य फंड घराण्यांनी सुरु केलेल्या योजनांद्वारे मिळणारा परतावा थोडाफार कमी आहे हेही निदर्शनास आले आहे.

  • वय वर्ष १२ ते ५५ १/२ पर्यंतची कोणतीही व्यक्ती किमान रु. ५०० भरून यामधे सहभागी होऊ शकते व या सदस्याला १५ वर्षांपर्यंत रु. ९०,००० किमान संरक्षण प्राप्त होते. दरमहा भरणा करण्याची रक्कम जशी वाढेल तशी विमा संरक्षण रु. १५ लाख पर्यंत वाढवता येते.
  • यामधे सर्व रक्कम एकरकमी भरण्याचा पर्याय आहे, तसेच १ वर्ष, ३ वर्ष व ५ वर्षांपर्यंतची रक्कम सुद्धा आगाऊ भरणा करणेसुद्धा शक्य आहे. एखाद्यावेळेस नजरचूकीने एखादा हप्ता भरणा करण्यास विलंब झाल्यास किंवा चुकल्यास दंडात्मक कार्यवाही होत नाही व विमा संरक्षण सुद्धा सुरु राहते.
  • दुर्दैवाने अत्यंत आवश्यकता भासल्यास आपण भरलेली रक्कम प्राप्त असलेल्या व्याजासह काढण्याचा पर्यायही उपलब्ध आहे, जर यामधे ५ वर्षे होऊन गेली असल्यास निर्गमन शुल्क सुद्धा लागत नाही.
  • आगाऊ रक्कम भरल्यास त्यावर 80 c अंतर्गत कर सवलत सुद्धा प्राप्त करता.
  • या मधील गुंतवणूक ही ६०% डेट फंड व ४०% इक्विटी फंड मधे होते. त्यामुळे साधारणपणे ११% पेक्षा जास्त परतावा.
  • या योजनेसाठी वैद्यकीय तपासणीची गरज भासत नाही.