इक्विटी इन्व्हेस्टींग दीर्घ कालावधीकरिता असते. कारण इक्विटी मार्केट अल्प कालावधीसाठी अतिशय अस्थिर असू शकते– याचा अर्थ शेअरच्या किमतींमध्ये फार चढ-उतार असतो. तरीच दीर्घ कालावधीत फंडामेंटल्स बाजी मारू शकतात आणि दीर्घ कालावधीकरिता असणारे इक्विटी रिटर्न्स उल्लेखनीयदृष्ट्या स्थिर राहतात. उलट असे म्हटले जाते की, बाजार हा अल्प कालावधीतील सौंदर्य स्पर्धेसारखा तर दीर्घ कालावधीसाठी वजनी काट्याप्रमाणे असतो. या विसंगती गुंतवणुकदारांना भेडसावत राहतात आणि मग त्यामुळे ते इतर अनुकूल पर्याय शोधतात.
 
त्यामुळे गुंतवणूकदारांना अतिशय सावध राहणे आवश्यक ठरते. तसेच अल्प कालावधीत इक्विटी मार्केटमधून निव्वळ पैसा कमविण्याचा हेतू असता कामा नये.
 
तरीच दीर्घ आणि अल्प कालावधीची योग्य व्याख्या कोणती? याचा संबंध उत्पन्न आणि आर्थिक चक्र तसेच बाजारातील भावनिक बदल यांच्याशी असतो. व्यापार हा काही एका ठराविक मार्गाने वाढत नसतो. ही वाढ विविध अंर्त-बाह्य कारणांनी अधिक अनियमितपणे जोडलेली असतात – जसे की, हंगाम, उत्पादनाचे लॉन्च चक्र इत्यादी. परिणामी, जेव्हा अल्प कालावधीसाठी स्टॉकचे मुल्यांकन करण्याची गरज निर्माण होते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर चुका होऊ शकतात. त्यामुळे मुलभूत दृष्टीकोन (फंडामेंटल परस्पेक्टीव्ह)च्या अल्प कालावधीत किंमती अस्थिर होतात.
 
गुंतवणुकदारांच्या भावनांमध्ये आलेले परिवर्तन हे अस्थिरतेचे फलित आहे. आपण जेव्हा बाजारात तेजी पाहतो, त्यावेळी त्याच स्टॉकसाठी उच्च मुल्यांकन बरे वाटते. मात्र घसरणीच्या काळात किमतीला देखील उतरणीची कळा लागलेली दिसते. वरील परिस्थिती पाहता दीर्घ मुदतीची इक्विटी इन्व्हेस्टमेंट ही वृद्धी चक्र आणि भावनांमुळे फारच अस्थिर असल्याचे दिसते. तसेच इतिहासात डोकावल्यास जेव्हा तुम्ही पाचपेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक करता- म्हणजे 7 ते 10 वर्षांकरिता. त्यावेळी तुम्ही भाग्यवान ठरू शकता आणि तुम्हाला अल्प कालावधीकरिता चांगला परतावा देखील मिळू शकतो. फक्त तुम्ही सातत्याने बाजाराच्या क्षमतेत सहभागी होऊन दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची गरज आहे.
 
ह्यावरून स्पष्ट आहे की, 3 वर्षांचा लॉक-इन पिरीयड संपल्यानंतर ईएलएसएसमधून बाहेर पडणे पुरेसे नाही. शेवटी ईएलएसएस फंड्स इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतात आणि याला न्याय देण्याच्या दृष्टीने गुंतवणुकदारांनी दीर्घ कालावधीकरिता गुंतवणूक करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. लक्षात असू द्या की, एकदा लॉक संपला, ईएलएसएस फंड इतर ओपन एंडेड फंडप्रमाणे आहेत. गुंतवणुकदारांना कधीही पसंतीप्रमाणे रिडीम करणे शक्य असते. त्यासाठीच लॉक-इनच्या शेवटी रिडीम करण्याला विशेष महत्व नाही.
– चंद्रेश निगम, एमडी आणि सीईओ, एक्सिस म्युच्युअल फंड.

अभिप्राय द्या!

Close Menu