ईएसजी निकषांवर आधारित देशातील पहिला फंड बनण्याचा मान एसबीआय म्युच्युअल फंडाला मिळला आहे. नवीन फंडाअंतर्गत ज्या कंपन्या सामाजिक, पर्यावरणविषयक आणि सरकारी धोरणांचे कठोर पालन करतात अशा कंपन्यांचा मिळून पोर्टफोलिओ बनवण्यात येणार आहे. त्यासाठी एसबीआयने आपल्या ‘एसबीआय मॅग्नम इक्विटी फंडाचे’ नाव बदलून ‘एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड असे ठेवले आहे. 
 
आर्थिक धोरणांबरोबरच सामाजिक, पर्यावरणविषयक आणि सरकारी धोरणांचे पालन करणे हा यामागचा दृष्टिकोन आहे. ३१ मे रोजी या फंडाचा ‘एयुएम’ २११६ कोटी एव्हढा होता. 
 
दीर्घकालीन गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने ईएसजी धोरण फायद्याचे ठरणार असल्याचे एसबीआय म्युच्युअल फंडाने म्हटले आहे.

अभिप्राय द्या!