अँक्सिस म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. नवीन योजनेतील गुंतवणूक हे क्लोज एंडेड इन्कम फंडात केली जाणार आहे. ‘अँक्सिस फिक्स्ड टर्म प्लॅन- सिरीज ९४ (१७७ दिवस)’ असे योजनेचे नाव असून कमी जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करता येणार आहे.  या फंडांतर्गत गुंतवणूक करण्यासाठी नवी फंड ऑफर (एनएफओ) जाहीर करण्यात आली असून ही ऑफर १४ जून ते १९ जून पर्यंत उपलब्ध असणार आहे.  एनएफओ काळात गुंतवणूक करण्यासाठी एका युनिटची दर्शनी किंमत 10 रुपये आहे. योजनेचा एनएफओ खरेदी करण्यासाठी कमीत कमी ५००० रुपयांची गुंतवणूक बंधनकारक आहे. 
 
‘अँक्सिस फिक्स्ड टर्म प्लॅन- सिरीज ९४ (१७७ दिवस)’ या योजनेअंतर्गत फंडात गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यानंतर हे पैसे फंडातर्फे प्रामुख्याने सरकारी व राज्य विकास सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जाणार आहेत.ऍसेट अलोकेशनच्या मर्यादेत राहून टी- बिल्स, रेपो, रिव्हर्स रेपो आणि सीबीएलओ अशा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये योजनेचे व्यव्थापन केले जाणार आहे. या योजने साठी कुठलाही एन्ट्री किंवा एक्झिट लोड नाही. 
 
देवांग शाह हे या फंडाचे व्यवस्थापन करणार आहेत.  

अभिप्राय द्या!

Close Menu