म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, मे महिन्यात गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे 7,304 कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक केली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात पैशांचा ओघ आल्याने म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) 23.43 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचली आहे.
 
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडियाने (ॲम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. मे महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये पैशाचा निव्वळ ओघ 7,304 कोटी रुपयांवर पोचला आहे. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये तो 6,690 कोटी रुपये होता. तसेच गेल्यावर्षी मे महिन्यात 4,584 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. देशातील 42 म्युच्युअल फंड कंपन्यांकडील एकत्रित ‘एयूएम’ एप्रिलमधील 23.25 लाख कोटींवरून आता 23.43 लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu