जुलै -सप्टेंबर या तिमाही सत्रासाठी पीपीएफ, छोट्या बचत योजनांचे व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. स्मॉल सेव्हिंग योजनांचे व्याजदर हे साधारणतः सरकारी कर्जरोख्यांमधून मिळणाऱ्या परताव्याशी संलग्न असतात. मागच्या सत्रात १० वर्षे मुदतीच्या सरकारी बॉण्डवर मिळणारे व्याजदर ८ (७.९) टक्क्यांच्या घरात गेले आहे. जो २०१५ नंतर सर्वात जास्त राहिला आहे. मात्र एप्रिल -जून या कालावधीकरता पीपीएफ किंवा छोट्या बचत योजनांच्या परतावा दरामध्ये कुठलाही बदल झाला नव्हता. त्यामुळे या सत्रात त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छोट्या बचत योजनांमध्ये पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना, राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा समावेश होतो. 
 
सरकारी बॉण्डवर मिळणारा परतावा मागील वर्षांपासून वाढत आहे. वाढत्या कच्च्या तेलाचे दर, महागाई तसेच वाढती वित्तीय तूट यामुळे सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी सरकारी कर्जरोख्यांवर मिळणार व्याजदर ८ टक्क्यांच्या घरात राहिला आहे. अशातच आरबीआयने रेपो दारात वाढ केल्याने आता पीपीएफ आणि स्मॉल सेव्हिंग योजनांचे व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अभिप्राय द्या!

Close Menu