सर्वसाधारणपणे प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये खालील प्रकार असावेत:
आपत्कालीन निधी : लिक्विड फंड, आर्ब्रिटाज फंड
नजीकच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी : आर्ब्रिटाज फंड, डेट फंड
कर नियोजनासाठी : ईएलएसएस
दीर्घावधीसाठी : बॅलन्स फंड, लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, सेक्टर फंड
- तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एकाच प्रकारच्या योजना का आहेत याचा शोध घ्या आणि जर योजनांची गुंतवणूक एकसारखीच असेल तर परतावे आणि जोखीम तपासून मग एकच योजना ठरवा. वेगवेगळे म्युच्युअल फंड जर एकाच योजनेअंतर्गत वेगळी गुंतवणूक करत असतील तर अधिक योजना असल्या तरी चालतील.
- जर लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड पोर्टफोलिओमध्ये असतील तर मग मल्टी कॅपची गरज तपासा.
- तुमच्या योजना तुमच्या आर्थिक ध्येयांशी निगडित असाव्यात. स्टार रेटिंग आणि जाहिरातींना भुलून गुंतवणूक करू नका.
- योजनेची जोखीम तुमच्या जोखीम क्षमतेनुसार आहे का हे बघा. फक्त मागील परतावे जास्त दिसतात म्हणून गुंतवणूक करू नका.
- आकर्षक नाव आणि वेगळी योजना म्हणून गुंतवणूक करू नका. योजनेचे उद्दिष्ट काय, कशात गुंतवणूक आहे किंवा करणार, एग्झिट लोड किती आणि कधी, खर्च किती हे सगळे समजून घ्या.
- योजनांचे एकत्रीकरण करताना कर नियमांचा आढावा घ्या.
- योजना तोटय़ात आहे म्हणून फायदा होण्यापर्यंत थांबू नका. कदाचित तोटा सहन करून मग विचारपूर्वक केलेली गुंतवणूक जास्त फायद्याची ठरेल